अमरावती- शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वी गरीबांना दहा रुपयात जेवण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर शिवथाळी सुरू करण्यात आली आहे. अमरावती शहरात देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागीत ही सुविधा नाही. त्या मागणीसाठी जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात पाच रुपयांत शिवथाळी विकून सरकारचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा- कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
मंगरूळ चव्हाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने थाटली होती. चौथीत शिकणाऱ्या सार्थक इंजळकरने शिवथाळीचा स्टॉल लावून ५ रुपयांत शिवथाळी दिली. यात बाजरीची भाकर, बेसन, भरीत, पकोडे इत्यादी साहित्य ठेवण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. राज्यात 125 केंद्रांवर या योजनेच्या माध्यमातून शिवभोजन देण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना ग्रामीण भागात सुद्धा सुरू करण्यात यावी, असा संदेश या विद्यार्थ्याने दिली आहे.