अमरावती: पहिले शैक्षणिक सत्र आज संपल्यावर उद्यापासून लागणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी चांदुर रेल्वे तालुक्यातील बासलापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्यांनी दिवाळी साजरी झाली. शाळेत विद्यार्थ्यांनी दिवे लावले, फटाके फोडलेत, शिक्षकांच्या वतीने त्यांना फराळही वितरित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी बनवले शाळेत दिवे: दिवाळीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम म्हणून बासलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील Zilla Parishad School at Baslapur विद्यार्थ्यांनी शाळेतच मातीचे दिवे बनविले. या दिव्यांना चिमुकल्यांनी रंगदेखील दिले. आम्ही स्वतः बनविलेले आणि रंगवलेले दिवेच दिवाळीला घरी लावू, असे या विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
रांगोळ्यांनी सजली शाळा: दिवाळीनिमित्त आज शाळेत सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले आकाश कंदील यावेळी शाळेत लावण्यात आले. शाळेत दिवे लावून विद्यार्थ्यांनी सुरसुऱ्या पेटविण्याचा आनंद घेतला. रंगीबिरंगी रांगोळी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवे ठेवून सुंदर अशी आरास तयार केली.
चिवडा, सोनपापडी आणि लाडू वर मारला ताव: आता शाळेला वीस दिवस दिवाळीच्या सुट्ट्या राहणार असून आज विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी केली. शिक्षकांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चिवडा सोनपापडी लाडू असा फराळ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. शाळेत आनंदात दिवाळी साजरी होऊन आता वीस दिवसांच्या सुट्ट्या राहणार याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.