अमरावती - महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी शहरातील विविध भागात पाहणी केली. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आज (23 मे) महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष चित्रा चौक येथे पाहणी केली. यावेळी पोलीस उपआयुक्त शंशीकांत सातव यांच्याशी चर्चा केली. या परिसरात गर्दीचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुकानदारांनी व ग्राहाकांनी दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासाठी कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश यावेळी आयुक्तांनी अतिक्रमन विभाग, बाजार व परवाना विभागाला दिले.
दुकानदारांना सूचना
मास्क न लावणाऱ्या, विनाकारन फिरणाऱ्या नागरिकांची चित्रा चौक येथे अँटीजेन टेस्ट करणे सुरु होते. या ठिकाणी आयुक्तांनी डॉ. संदिप पाटबागे यांच्याशी चर्चा करून सद्याच्या कार्यवाहीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी टेस्टींग वाढविण्याच्या सूचना दिल्या. इतवारा परिसराची पाहणी करताना जे दुकाने ११ वाजल्यानंतरही उघडी होती. त्यांना बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या. दुकानदारांनाही त्यांनी यावेळी सूचना दिल्या. 'दुकानदारांनी दिलेल्या वेळेतच आपले दुकान उघडावे. शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे', असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी म्हटले.
टेस्ट वाढवण्याच्या सूचना
गांधी चौक येथे मनपातर्फे फिरत्या पथकाव्दारे अँटीजेन टेस्ट करणे सुरु होते. यावेळी डॉ. देवेंन्द्र गुल्हाने यांच्याशी आयुक्त रोडे यांनी संवाद साधला. टेस्टींग वाढविण्याच्याही सुचना यावेळी त्यांनी दिल्या. आयसोलेशन रुग्णालय नवाथे येथेही त्यांनी भेट दिली. तसेच आजच्या चाचण्यांची माहिती घेतली. रविवार असूनही या ठिकाणी ६६ चाचण्या झालेल्या आढळून आल्या.
साईनगर परिसराची पाहणी
तसेच, आयुक्त रोडे यांनी साईनगर परिसराचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वास्थ निरीक्षकाला स्पष्ट सूचना दिल्या, की '११ वाजल्यानंतर कोणतेही दुकान, भाजीपाला गाड्या चालू राहता कामा नये. दिलेल्या अवधीतच दुकान सुरु ठेवावे. गर्दी होवू नये यासाठी आपल्या स्तरावरून योग्य नियोजन करावे'.
हेही वाचा - चुकून सीमा ओलांडून दोन तरुणांचा भारतात प्रवेश; मोठ्या मनानं भारतीय सैन्याने मायदेशी पाठवलं