अमरावती - कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सीमावर आता दुसऱ्या राज्यातील नागरिकांना अडविण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील भोकरबर्डी चेकपोस्टवर, मध्यप्रदेशातून येणाऱ्या गाड्याची तपासणी करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून येणाऱ्या नागरिकांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच त्यांना अमरावती जिल्ह्यात प्रवेश दिला जातो आहे. जर त्यांच्याकडे रिपोर्ट नसेल तर त्यांना आता परत पाठवलं जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र व मध्यप्रदेश बॉर्डरवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये वनविभाग, शिक्षन विभाग आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा- तन्मय माझा लांबचा नातेवाईक; पुतण्याच्या लसीकरणाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर