अमरावती- शहरात शनिवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यात शहरातील अनेक झाडे कोसळली असून वीजेच्या तराही तुटल्या आहेत.
गत चार महिन्यांपासून दुष्काळाची झळ सहन कारणाऱ्या अमरावती शहरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. ७ वाजता विजांचा कडकडाट व्हायला लागला. त्यानंतर ७.३० वाजता अचानक आलेल्या वादळामुळे तारांबळ उडाली. या वादळामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळली व वीज तारा तुटल्या. रस्त्यावरील हातगाड्या, टपरीही उलटल्या. सायन्सकोर जिल्हा परिषद उर्दू शाळेवरील 25 पत्रेही उडाली.
वादळामुळे आनंदमेळाव्यातील दुकानांवरील पत्रेही उडाली आहेत. मात्र, या वादळात कोणतीही जीवहानी झाली नाही. यशोदानागर, चप्रशिपुरा, पोलीस आयुक्तालय, मालतेकडी, कॉंग्रेसनगर या भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली असून अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत.