अमरावती मेळघाटात धारणी तालुक्यातील कलमखार गावातील suicide incident in Melghat Dharni रामू गायकवाड याने स्वत:च्या अंगावर मासेमारीकरिता वापरात येणारे बारुदने भरलेले जिलेटीन स्वतःच्या gelatin explosion on body अंगावर मोबाईलच्या बॅटरीच्या करंटने फोडून चेहऱ्याचे व खांद्याचे चिथळे चिथळे उडवून आत्महत्या committed suicide by tearing face and shoulders केली आहे.
कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल मध्यप्रदेशातून धारणी तालुक्यातील कळमखार गावातील महिलेशी लग्न करून तेथेच सासऱ्याच्या शेजारी घरजवाई म्हणून मागील दहा वर्षापासून रामू मधू गायकवाड वय 30 वर्षे व त्याची पत्नी व दोन मुले राहत होते. त्या दोघामध्ये घरगुती कारणावरून दोन दिवसापासून वाद सुरू होता. त्या वादातून त्याने त्याच्या पत्नीला व मुलाना घरातून दोन दिवसांपासून हाकलून दिले होते. तरीसुद्धा त्याची पत्नी मंगळवारी सकाळी सहा वाजता त्याच्या घरी गेली होती. तेव्हा पण पुन्हा त्याने तिला हाकलून दिले व त्याचदरम्यान त्याने मासेमारी करण्याकरिता वापरण्यात येणारे घरात असलेले जिलेटिन स्वतःच्या गळ्याला गुंडाळून घेतले व त्याच्या वायरला मोबाईलच्या बॅटरीचा करंट देऊन ते स्वतःच्या अंगावर फोडून आत्महत्या केली. त्या जिलेटीन च्या स्फोटाने रामूच्या शरीराचे चिथळे चिथळे उडाले. दोघांच्या वादामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासावरून व्यक्त केला जात आहे.
जिलेटीनच्या स्फोटाच्या आवाजने गावकरी भयभीत पहाटे सव्वा सात वाजताच्या दरम्यान रामू गायकवाड यांनी गळ्यात जिलेटीन बांधून स्फोट करून आत्महत्या केली. त्या जिलेटिनच्या स्फोटाचा आवाज मोठ्याचा झाल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले व गावात बॉम्ब फुटला अशी अफवा पसरली. यानंतर शेजाऱ्यांनी रामूच्या घराकडे धाव घेतली असता तेथे रामूने जिलेटीन स्वतःच्या अंगावर फोडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचल्या नंतर रामूचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे पाठविण्यात आला.