ETV Bharat / state

Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा - गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाणे

Amravati Crime कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकाला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आज ही कारवाई केली आहे.

Amravati Crime
Amravati Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 10:37 PM IST

Updated : Sep 26, 2023, 10:56 PM IST

गुन्हा दाखल करून तातडीनं अटक

अमरावती Amravati Crime- शहरातील एका नामांकित शाळेतील पाचवीच्या दोन विद्यार्थींनीना शिक्षकानं बॅड टच केल्याचं प्रकरण नुकतेच घडले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत 54 वर्षीय शिक्षकानं विनयभंग केल्याची तक्रार 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीने केली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी त्या शिक्षकाविरुध्द मंगळवारी पोक्सो, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

असे आहे प्रकरण- तक्रारदार विद्यार्थीनी ही खेळाडू असून ती खेळायचा सराव करते. त्यासाठी तिला संबधित क्रीडा शिक्षक अनेकदा मार्गदर्शन करतात. तसेच हे क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना योगाचे धडे देतात. पीडितेच्या तक्रारीनुसार काही दिवसांपुर्वी या शिक्षकाने म्हटले की, आपण खेळाडू असल्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची मसाज करणे गरजेचे आहे. मी माझ्या शरीराची मसाज करतो. त्या ठिकाणी तू पण ये. तू पण मसाज कर, असे पीडित तक्रारदार विद्यार्थीनीने तक्रारीत नमूद केले आहे. हा प्रकार मागील महिनाभरापूर्वी घडला आहे. या काळात शिक्षकाने आपल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचेही पीडितेनं तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवरुन सदर शिक्षकाविरुध्द पोक्सो, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करून तातडीनं अटक केली आहे.

क्रीडा शिक्षकाला खंडणी मागणाऱ्याविरुद्ध गुन्हा- या प्रकरणात एका व्यक्तीने संबधित क्रीडा शिक्षकाला 18 सप्टेंबर 2023 रोजी कॉल करुन पत्रकार बोलत असल्याचं सांगितलं. तुमची तक्रार माझ्याकडे आली आहे. हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी 1 लाख रुपये खंडणी द्यावी, अन्यथा आपल्याला त्रास होईल, अशी कथित पत्रकारानं क्रीडा शिक्षकाला धमकी दिली. अशी तक्रार संबधित क्रीडा शिक्षकानं त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्याला 15 सप्टेंबरला दिली. तसेच मंगळवारी (दि. 26) हीच तक्रार गाडगेनगर पोलिसात दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी संबधित खंडणी मागणाऱ्याविरुध्द खंडणी मागणे, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाणे यांनी दिली आहे.

हेही वाचा-

  1. Thane Crime: दुर्गाडी पुलावरील डंपर चालकाच्या हत्येचा अखेर उलगडा, पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना वांद्रे रेल्वे स्थानकातून अटक
  2. Whale fish Vomit : महाबळेश्वरात व्हेल माशाची साडेसहा कोटींची उलटी जप्त, माजी नगरसेवकासह चौघांना अटक

Last Updated : Sep 26, 2023, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.