ETV Bharat / state

पिंगळा देवीवर हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रद्धा ; मशिदीसारखा मंदिराचा घुमट

नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातील विविध आदिशक्तीच्या मंदिरांचा आढावा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी घेत आहेत. या लेखातून जाणून घ्या अमरावतीच्या मोर्शीतील पिंगळादेवीबद्दल...विहिरीतून स्वयंभू प्रकट झालेल्या पिंगळादेवीच्या मंदिराचे बांधकाम मुस्लीम कारागिरांनी केले आहे. या मंदिराचा घुमट मशिदीच्या घुमटाप्रमाणे आहे. हिंदू भविकांसोबतच अनेक मुस्लीम भाविकही मोठ्या श्रद्धेने पिंगळा मातेच्या दर्शनासाठी गडावर येतात.

goddess temple in amravati
पिंगळा देवीवर हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रद्धा ; मशिदीसारखा मंदिराचा घुमट
author img

By

Published : Oct 21, 2020, 6:36 AM IST

अमरावती - सकाळी कुमारिका, दुपारी स्त्री आणि सायंकाळी वृद्ध असे दिवसातून तीन रूप धारण करणाऱ्या पिंगळादेवीचे मंदिर अमरावती- मोर्शी मार्गावरील गडावर आहे.

विहिरीतून स्वयंभू प्रकट झालेल्या या देवीच्या मंदिराचे बांधकाम मुस्लीम कारागिरांनी केले आहे. या मंदिराचा घुमट मशिदीच्या घुमटाप्रमाणे आहे. हिंदू भविकांसोबतच अनेक मुस्लीम भाविकही मोठ्या श्रद्धेने पिंगळा मातेच्या दर्शनासाठी गडावर येतात.

पिंगळा देवीवर हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रद्धा ; मशिदीसारखा मंदिराचा घुमट

नावरात्रोत्सव संपूर्ण अमरावती जिल्ह्यात थाटात साजरा होत असताना जिल्ह्यातील आंबादेवी आणि एकविरादेवी प्रमाणेच मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गडावर स्थित पिंगळादेवीचे महत्त्व आहे. दरवर्षी नवरात्रात पिंगळामातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक गडावर येतात. यावर्षी कोरोनामुळे मंदिर उघडण्याची परवानगी शासनेने दिली नाही. त्यामुळे गडावर नवरात्रोत्सवातही शांतता आहे. मंदिरालगतच्या हार, फूल आणि प्रसादवाल्यांचा व्यवसायही यंदा ठप्प आहे.

विहिरीतून पिंगळा देवीच्या मूर्तीसोबतच कमळजा देवीची मूर्ती स्वयंभू प्रकट झाली आहे. याठिकाणी हेमाड पंथी मंदिर उभारण्यात आले. निजाम शासकांनी या मंदिर बांधण्याची जबाबदारी घेतली आणि मुस्लीम कारागिरांनी या मंदिराचा घुमट मशिदीसारखा तयार केला. सकळी 9 वाजेपर्यंत जे भाविक मंदिरापर्यंत येतात, त्यांना देवीचे दर्शन होते. मात्र 9 वाजता पोलीस बंदोबस्त लागताच गडाच्या पायथ्यापासून प्रवेश बंद होतो.

हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

विशेष म्हणजे पूर्वी हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माचे भाविक देवीची उपासना करायचे. आजही अनेक मुस्लीम भाविक देवीच्या दर्शनाला येत असल्याची माहिती पिंगळादेवी मंदिर संस्थांचे सचिव आशिष मारोडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

पिंगळा देवीचे रूप दिवसातून तीन वेळा बदलते. सकळी देवीचे दर्शन घेताना मूर्ती ही कन्यारूपी असल्याचे जाणवते. दुपारी मूर्ती स्त्री प्रमाणे दिसते आणि सायंकाळी वृद्धावस्थेतील महिलेप्रमाणे मूर्तीचे दर्शन घडते, अशी अख्यायिका आहे. अतिशय प्रसन्न आणि उंच गडावर असणाऱ्या या मंदिर परिसरात नावरत्रोत्सवात पाय ठेवायला जागा नसते. यावर्षी मात्र गड शांत आहे. काही भाविक कसेबसे गडावर आले, तर मंदिराच्या बंद दारासमोर नतमस्तक होत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.