अमरावती: खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे आज अमरावतीच्या आराध्य दैवत श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीचे मंदिर दुपारी 12:30 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहे. दिवाळी सणानिमित्त एकवीरादेवी मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा अमावास्येच्या दिवशीच खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने दर्शनासाठी एकवीरादेवी मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंदिर परिसरात शुकशुकाट: दिवाळीला शेकडो भाविकांनी श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले आहे. आज सूर्यग्रहण असल्यामुळे ही दोन्ही मंदिर दुपारी 12:30 वाजता बंद करण्यात आली. सूर्यग्रहण असल्यामुळे मंदिर परिसरातील अनेक दुकानात उघडलीच नसून संपूर्ण मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
सायंकाळी 7 वाजता उघडणार मंदिर: सायंकाळी 4:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सूर्यग्रहण असून हे सूर्यग्रहण फुटल्यावर दोन्ही मंदिर पाण्याने धुण्यात येणार आहे. मंदिर धुतल्यावर सायंकाळी 7 वाजता दोन्ही मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.