ETV Bharat / state

अमरावतीहून 'श्रमिक एक्सप्रेस' रवाना; बिहारमधील 568 कामगार आपल्या राज्यात परत

author img

By

Published : May 20, 2020, 10:53 AM IST

रेल्वेस्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नानकरोटी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या भोजन, चहा, पाणी आणि इतर व्यवस्था यावेळी करण्यात आली. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता.

अमरावतीहून श्रमिक एक्सप्रेस रवाना
अमरावतीहून श्रमिक एक्सप्रेस रवाना

अमरावती - विभागात अडकलेल्या कामगारांना स्वगृही सोडण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी रवाना झाली. ही एक्सप्रेस विनाथांबा असून बरौनीपर्यंत जाणार आहे. यात 24 डबे आहेत. अमरावती विभागातील 568 यावेळी रवाना झाले. यासोबत नागपूर रेल्वेस्थानकावरून नागपूर विभागातील सुमारे 700 कामगारांना या एक्सप्रेसमधून घरी पाठवण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी आदी उपस्थित होते.

रेल्वेस्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नानकरोटी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या भोजन, चहा, पाणी आणि इतर व्यवस्था यावेळी करण्यात आली. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि विविध अधिकाऱ्यांनी प्रवाशाशी संवाद साधून त्यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींबाबत आवाहन केले आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - धुळे जिल्ह्यात आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

कामागारांची भावना -

संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडल्यामुळे कुटुंबीयांशी केवळ फोनद्वारे संपर्क होत होता. मात्र, शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना अनेक दिवसांनी प्रत्यक्ष भेटता येणार आहे. अनेक दिवसांनी घरी परतण्याचा आनंद मोठा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.