अमरावती - मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा शुक्रवारी दुपारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात शिवसेनेने एसडीओ कार्यालयावर टांग्याने जाऊन निषेध नोंदवला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव वाढ केल्यामुळे ते सर्वसामान्यांना न परवडणारे असून या महागाईत सामान्य माणूस भरडला जात आहे. त्यामुळे या दरवाढीचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी चांदूर रेल्वे शहर व तालुक्यातील शिवसैनिक टांगाघोडाने स्थानिक उपविभागीय कार्यालयावर पोहचले होते व याबाबतचे निवेदन त्यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना सादर केले.
शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शाम देशमुख, उपजिल्हाप्रमुख डॉ. प्रमोद कठाळे, चांदूर रेल्वे तालुका प्रमुख राजेंद्र निंबर्ते, शहर प्रमुख स्वप्नील मानकर, निलेश तिवारी, कौस्तुभ खेरडे, गजानन बोबडे, राजाभाऊ मेटे, त्रिलोकचंद मानकानी, अमित भगत, विनोद बांगडे, मोरेश्वर पाटील, अशोक पांडे, ज्ञानेश्वर पवार, बाबाराव खोडके, संजय चौधरी, शुभम ठाकरे, अरुण कावलकर, रवि दीक्षित, पुंडलिक जाधव, अंकुश पटले, एकनाथ तायवाडे, अशोक मने, दीपक कुमरे, आशिष गावंडे, निखिल कपिले, रोशन खंडार, अजिंक्य पाटणे आदी शिवसैनिक व तालुकावासी उपस्थित होते.