ETV Bharat / state

Actress Sharvari Jamenis : कथ्थकसह सर्वच कलांसाठी अमरावती पोषक वातावरण - शर्वरी जमेनिस - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

दोन दिवसांपासून मी अमरावतीत आहे आणि अमरावतीत आल्यावर विदर्भातील कथ्थक सह इतर कलाक्षेत्रात कला जोपासणाऱ्यांसाठी इथले वातावरण अतिशय पोषक आहे. अमरावतीतील कलावंतांना पाहून नृत्य साठी दिवस उज्वल आहेत. आणि अमरावतीतून आपल्याला खूप चांगले कलावंत मिळतील अशी आशा कथ्थक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी व्यक्त केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कथ्थक नृत्य कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी त्या अमरावतीत आल्या आहेत.

Actress Sharvari Jamenis
शर्वरी जमेनिस
author img

By

Published : Feb 26, 2023, 4:49 PM IST

कथ्थकसह सर्वच कलांसाठी अमरावती पोषक वातावरण - शर्वरी जमेनिस

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादेशिक कला विभागाच्या वतीने मला दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी अमरावतीत निमंत्रित केले. अमरावतीला यायला निघाले तेव्हा अमरावतीच्या कलावंतांबाबत मी साशंक होते मात्र इथली वास्तविक परिस्थिती अतिशय वेगळी असल्याचे पाहून मला आनंद होत असल्याचे शर्वरी जमेनिस म्हणाल्या. अमरावती विद्यापीठात मी आले असताना अवघ्या पंधरा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या प्रादेशिक कला विभागाने तयार केलेला रंगमंच. रंगमंचाला लागून कलावंतांना तयारी करण्यासाठी अतिशय दर्जेदार असे ग्रीन रूम या ठिकाणी आहे.त नाटकासह संगीतासाठी लागणारे सर्व साहित्याची उपलब्धता या ठिकाणी आहे. इथे एकूणच वातावरण हे नृत्य आणि नाटक शिकण्यासाठी पोषक आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांना देखील इतकी उत्कृष्ट सुविधा सहज उपलब्ध होत नाही असेही शर्वरी जमेनिस बोलल्या. मुंबई आणि पुण्याच्या कलावंतांनी अमरावतीत आल्यावर एकदा तरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रादेशिक कला विभागाला भेट द्यावी असे आव्हान देखील शर्वरी जमेनिस यांनी केले आहे.

अमरावतीतून खूप चांगले कलावंत मिळतील : दोन दिवसांपासून मी अमरावतीत आहे आणि अमरावतीत आल्यावर विदर्भातील कथ्थक सह इतर कलाक्षेत्रात कला जोपासणाऱ्यांसाठी इथले वातावरण अतिशय पोषक आहे. अमरावतीतील कलावंतांना पाहून नृत्य साठी दिवस उज्वल आहेत. आणि अमरावतीतून आपल्याला खूप चांगले कलावंत मिळतील अशी आशा कथ्थक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी व्यक्त केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कथ्थक नृत्य कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी त्या अमरावतीत आल्या आहेत.

ही कार्यशाळा उत्तमच : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादेशिक कला विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातील अनेक युवती सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता अतिशय छान बघायला मिळाली. मी जे काही सांगते आहे ते त्या नीट समजून घेत आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मनावर घेऊन मेहनत केली तर नृत्यासाठीचे दिवस फार चांगले असतील आणि अमरावतीतून आपल्याला चांगले कलाकार मिळतील असे देखील शर्वरी जमेनिस म्हणाल्या.

प्रशिक्षणार्थी घेत आहेत कथ्थकचे धडे : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिघात येणाऱ्या अमरावतीसह अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यातील नृत्य कलावंत या प्रशिक्षण कार्यशाळेत खास शर्वरी जमेनिस यांच्याकडून कथ्थक चे धडे घेत आहेत. सलग दोन दिवसांपासून सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत सहभागी बाहेर गावच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातच राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : Anushka Sharma shared Instagram story : अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला 'सन किस्ड सेल्फी', वाचा अनुष्काच्या स्किन केअर रूटीनबद्दल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.