अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसीतील श्याम इंडो फॅब कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे पगार मिळत नसल्याचा आरोप करत आज (दि. 7 नोव्हेंबर) आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंपनीची तोडफोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
कंपनीच्या कामगारांकडून आठ तासांतऐवजी बारा तास काम करून घेत आहेत. मात्र, त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. शासन नियमाप्रमाणे आठ तासाचे 366 रुपये व बारा तासचे 550 रुपये देय असताना त्यांना 250 ते 300 सत्तर रुपये रोज दिला जात आहे, असेही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची आत्महत्या; अमरावतीच्या ममदापूर येथील घटना
हेही वाचा - तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या, अन्यथा आंदोलन करु; सत्यपाल महाराजांचा सरकारला इशारा