अमरावती - एकेकाळी नायलॉनच्या पिशव्या शिवून बाजारात विकणाऱ्या शालूताई धाकडे यांनी आपल्या मेहनतीच्या भरवशावर येथिल प्रथितयश ड्रीमलँड मार्केट मध्ये स्वतः चा रेडिमेड गारमेंट निर्मितीचा कारखाना सुरू केला ( Shalutai sews nylon bags and sells in market )आहे. कारखाना सुरू केल्या केल्या पुन्हा एकदा कोरोनाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला खरी, पण थांबतील त्या शालूताई (Shalutai tough journey ) कसल्या. जिद्दीने काम करत राहिल्या आणि आज वर्ष दीड वर्षात त्यांनी आपल्यातील असलेल्या उद्योजिकतेची चुनुक समाजाला दाखवून देत, महिला पण कुठे कमी नाहीत याचा प्रत्यय आणून दिला (Tough Journey of Entrepreneurship )आहे.
शालू ताईंचा उद्योजकतेचा प्रवास - एके काळी दुसऱ्यांकडे मजुरीकरता जाणाऱ्या शालू ताईंनी आज मात्र ८ ते १० मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला ( Generate Employment TO 8 To 10 Laborers )आहे. त्यांची आज वार्षिक उलाढाल १३ ते १५ लाख रुपयांच्या घरात (annual turnover of Business Rs13 to 15 lakh )आहे. त्यांचा उद्योजकतेचा प्रवास थक्क करणारा तर आहेच पण नव उद्योजकांसाठी आणि तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी सुद्धा आहे.
फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा - फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित असलेल्या शालुताई धाकडे सिद्धार्थ नगरच्या झोपडपट्टीत राहतात. नायलॉनच्या पिशव्या शिवण्याच्या उद्योगासोबतच त्यांनी घरपोच किराणा उद्योग सुरू केला. दहा बाय दहा च्या खोलीमधूनच त्यांनी आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात केली. 'सांजी आणणे आणि सांजी खाणे' अशी स्थिती असलेल्या झोपडपट्टी मधील लोकं महिन्याचा किराणा एकाच वेळेस घेऊ शकत नाही म्हणून त्यांच्या सुविधेसाठी ' किस्तीवर घरपोच किराणा पुरविण्याचा उद्योग' त्यांनी 20 योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण जिल्हा उद्योग केंद्र दाखल केले 15 मध्ये सुरू केला.
त्यांच्या कारखान्यात काय तयार होते? - शाळेचा गणवेश (school uniform) , क्रीडा करिता लागणारे कपडे, (sports wear),लोवर, टी शर्ट, सर्व प्रकारचे रेडिमेड गारमेंट तयार करण्याचे काम त्यांच्या कारखान्यातून होत असल्याचे शालू ताई यांनी सांगितले.
पश्चिम विदर्भातील कापडाची मोठी बाजारपेठ- पश्चिम विदर्भात अमरावती येथे कापड व्यवसायाची खूप मोठी बाजारपेठ आहे. बिझिलँड, सिटीलँड, ड्रीमलॅंड असे तीन मोठे रेडिमेड कापडाचे मार्केट येथे आहेत. दरदिवशी करोडो रुपयांची उलाढाल येथून होते. यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा सह अन्य जिल्ह्यातील घाऊक कापड व्यावसायिक कपडे खरेदी करण्यासाठी येथे येतात.
जिल्हा उद्योग केंद्र आणि एमसीईडी - महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र यांच्यामार्फत आयोजित शिवणकला प्रशिक्षण घेतले. उद्योग काय असतो, तो कसा उभारावा, उद्योजकात कोणते कौशल्ये असावेत, कोणता उद्योग निवडावा, का निवडावा, भांडवल कुठून व कसे उपलब्ध करावे, अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मला उद्योजकता विकास प्रशिक्षण निवासी शिबिरात मिळाल्याची माहिती शालूताई सांगतात. जिल्हा उद्योग केंद्राचे उदय पुरी, एमसीईडी चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी तर तांत्रिक मार्गदर्शन रेगझा सिटी क्रियेशन चे संचालक राजेश वानखडे, कायझेन ग्रुप कंपनी संचालक पंकज सोनोने यांनी केल्याचे शालू ताई यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले.
कर्ज देण्यास बँकेचा नकार - उद्युक्त विकास प्रशिक्षण आटोपल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण जिल्हा उद्योग केंद्राकडे दाखल केले. कर्ज प्रकरण दाखल केल्या नंतर नियमाप्रमाणे मार्केटमध्ये गाळा भाड्याने आवश्यक होता. त्यानुसार करार पत्र व इतर कागदपत्रांची पूर्तता बँकेला केली. पण तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता या कारणास्तव बँकेने त्यांचे कर्ज नामंजूर केले. तर दुसरीकडे लॉकडाऊन लागल्याने वर्ष भर गाळ्याचा हप्ता घरुन भरावा लागला. मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेल्या 50 हजार रुपयाचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरले होते.त्या एका जमेच्या बाजूवर बँकेने मला 9 लाखाचे कर्ज मंजूर केले. कर्जाचा पहिला धनादेश मिळाला. कारखाना सुरू करणार तेवढ्यातच पुन्हा लॉक डाउन लागल्याने उद्योगाला पुन्हा ब्रेक लागला.
आता मात्र सगळे सुरळीत - पूर्वी दुसऱ्याकडे मोलमजुरी करिता जाणारे माझे पती माझ्या उद्योगात हातभार लावतात. मुलगी बी.एस.सी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे तर मुलगा नुकताच 12 वी उत्तीर्ण झाला आहे.त्यांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाचा गाडा हाकणे,मजुरांचे पगार, दुकान भाडे आणि ईतर किरकोळ खर्च भागवून बँकेचा हप्ता सुद्धा नियमितपणे भरते.व्यावसायिकाच्या अंगी विक्रय कला असणे खूप महत्त्वाचे आहे. ती नसेल तर व्यवसाय करणे कठीण आहे. नविन पिढीने नक्किच व्यवसायात यावे परंतु त्याआधी ज्या व्यवसायात जायचे आहे त्या व्यवसायाचा अनुभव घेण्यासाठी कुठे तरी काम करावे नंतरच उद्योग उभारावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.