अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली. यात अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
विकेंड लॉकडाऊनची घोषणा
हा लॉकडाऊन सोमवारी रात्री आठ वाजेपासून सुरु होणार आहे. या लॉकडाऊनमध्ये मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंतच अमरावती शहर हे अनलॉक असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सकाळपासून दिसून येत आहे. अमरावतीमधील महत्वाची बाजारपेठ असलेल्या शक्कर साथ परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.
हेही वाचा - कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या वरवरा राव यांना जामीन मंजूर