अमरावती - येथे एका युवकाने खाजगी ट्रान्सपोर्टची बस अमरावतीच्या मार्गाने भरधाव वेगाने दौडवल्याची घटना समोर ( Amravati Youth Run Bus ) आली आहे. अमरावतीला जाण्याकरिता एका पेट्रोल पंपाजवळ बस उभी असताना तिचा ताबा या युवकाने घेतला होता. सुदैवाने यामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही आहे. नागरिकांनी बस थांबवून युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
राज्य शासनात विलगीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ( St Worker Strike ) गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात खाजगी बस वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अमरावतीच्या परतवाडा बस स्थानकाच्या परिसरातून दररोज अनेक खाजगी बस अमरावती अंजनगाव, बैतुल सह आदी ठिकाणी धावतात. त्यातच एक खाजगी ट्रान्सपोर्टची बस अमरावतीला जाण्यासाठी उभी होती.
हीच संधी साधून युवकाने बस थेट अमरावतीच्या मार्गाने पळवायला सुरुवात केली. यामुळे रस्त्यात येणाऱ्या दुचाकी आणि इतर वाहणांचा काही काळ गोंधळ उडाला होता. यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नाही. माहिती मिळताच नागरिकांनी बस थांबवुन युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा - Kolhapur Accident : चारचाकी आणि पोलीस व्हॅनमध्ये जोरदार धडक