ETV Bharat / state

फटाक्यांच्या गोदामाला लागूनच उभारली शाळा; नियम धाब्यावर बसवत चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ - फटाके

भविष्यात दुर्दैवाने फटाक्यांच्या गोदामात घातपात होऊन दुर्घटना घडून चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याला कोण जबाबदार ठरेल असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.

फटाक्यांच्या गोदामाला लागूनच उभारली शाळा; नियम धाब्यावर बसवत चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:25 AM IST

अमरावती - तालुक्यातील कठोरा या गावात एडिफाय ही नामांकित शाळा धोकादायक ठिकाणी बांधण्यात आली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली ही शाळा एका फटाक्याच्या गोदामाला लागूनच बांधण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने फटाक्यांच्या गोदामात अपघात झाल्यास चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला जबाबदार ठरेल असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शाळा नेमकी कुठे असावी याचे ठराविक नियम आहेत. असे असताना देखील अमरावतीत फटाक्यांच्या गोदमाला लागून शाळा सुरू करण्याची परवानगी कशी देण्यात आली, या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कसे नाही, अमरावतीचे कोणी लोकप्रतिनिधी या गंभीर विषयाची दाखल का घेत नाहीत, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

फटाक्यांच्या गोदामाला लागूनच उभारली शाळा; नियम धाब्यावर बसवत चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष राहुल माटोडे यांनी, फटाक्यांच्या गोदमालागत शाळा सुरू होण्याची परवानगी मिळवून देण्यात काही लोकप्रतिनिधींनी हात तर ओले करून घेतले असावेत, असा संशय व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी यांनीही पैसे खाऊन शाळा संचालकांना बेकायदेशीर परवानगी मिळवून दिली असल्याचा आरोपही राहुल माटोडे यांनी केला आहे.

चिमुकल्या जीवांशी खेळ करणाऱ्या या गंभीर प्रकारासाठी नेमकं कोण जबाबदार आहे यासाठी येत्या दोन दिवसात शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने जाब विचारण्यात येईल, असेही राहुल माटोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.

Intro:फटाक्यांच्या गोदमला लागून चक्क शाळेची भली मोठी इमारत उभारण्यात आली. लाखो रुपये डोनेशन देऊन अमरावती शहरातील श्रीमंतांची पाल्ल्य या शाळेचे विद्यार्थी आहेत. शाळा सुरू असताना दुर्दैवाने फटाक्यांच्या गोदामात भविष्यात घातपात झाला तर चिमुकल्या जीवांचे काय होणार असा विचार जरी मनात आला तर धस्स होतं. शाळा नेमकी कुठे असावी याची भलीमोठी नियमावली असताना अमरावतीत फटाक्यांच्या गोदमला लागून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी नेमके नियम कोणी आणि कसे धब्यावर बसविले असा गंभीर प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

Body:अमरावती शहरापासून चांदूरबाजार मार्गावर कठोरा या गावापुढे एडिफाय ही नामांकित शाळा आहे. ही शाळा या परिसरात अवघ्या दोन ते तीन वर्षांआधी सुरू झाली.तीन मजली इमारतिच्या या भल्यामोठ्या आणि सूसज्ज शाळेला अगदी लागून फटाक्यांचे गोदाम आहे.शाळेचे प्रवेशद्वार फटाक्यांचा गोदमला लागून आहे तर गोदमला मागच्या बाजूला लागूनच शाळेची इमारत आहे.
भविष्यात दुर्दैवाने फटाक्यांच्या गोदामात घातपात होऊन दुर्घटना घडली तर शाळेतील विद्यार्थ्यांना याची झळ बसू शकते किंबहुना चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
फटाक्यांच्या भल्यामोठ्या गोदमाजवळ शाळा सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली काशी. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कसे नाही. अमरावतीचे कोणी लोकप्रतिनिधी या गंभीर विषयाची दाखल का घेत नाहीत, पालकांचे डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या मुलांना मृत्यूच्या दारावर सोडण्याचे धाडस कसे काय झाले असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष राहुल माटोडे यांनी फटाक्यांच्या गोदमलागत शाळा सुरू होण्याची परवानगी मिळवून देण्यात काही लोकप्रतिनिधींनी हात तर ओले करून घेतले नसावे असा संशय व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींसाह शिक्षण विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी यांनीही पैसे खाऊन शाळा संचालकांना बेकायदेशीर परवानगी मिळवून दिली असल्याचा आरोपही राहुल माटोडे यांनी केला आहे. चिमुकल्या जीवांशी खेळ करणाऱ्या या गंभीर प्रकारासाठी नेमका जबाबदार कोण आहे यासाठी येत्या दोन दिवसात शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने जाब विचारण्यात येईल असेही राहुल माटोडे यांनी 'ईटीव्ही भारता' शी बोलताना म्हंटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.