ETV Bharat / state

'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'साठी अमरावतीत महामोर्चा; खुल्या प्रवर्गातील गुणवंतांचे नुकसान - agitation in amravati

सरकारचे अति आरक्षण धोरण हे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आड येणारे असून यामुळे राष्ट्रहिताला अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने आपले धोरण बदलावे या मागणीसाठी शहरात रविवारी 'सेव्ह मिरीट सव्ह नेशन' संघटनेच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला.

अमरावतीत महामोर्चा
author img

By

Published : Sep 15, 2019, 2:42 PM IST

अमरावती - 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' अशा घोषणा देत अमरावती शहरात हजारोच्या संख्येत महामोर्चा निघाला. सरकारचे अति आरक्षण धोरण हे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आड येणारे असून यामुळे राष्ट्रहिताला अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने आपले धोरण बदलावे या मागणीसाठी शहरात रविवारी 'सेव्ह मिरीट सव्ह नेशन' संघटनेच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला.

'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'साठी अमरावतीत महामोर्चा

'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे संस्थापक अनिल लद्धड यांच्या मार्गदर्शनात दसरा मैदान येथून राजापेठ-राजकमल चौक मार्गे हा महामोर्चा नेहरू मैदान येथे धडकला. या महामोर्चात हिंदू, मुस्लीम, शिख अशा सर्व धर्मातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या आरक्षण धोरणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. व्होट बँकेसाठी सरकार चुकीचे धोरण राबवित आहे. आज खुल्या प्रवर्गातील 2% गुणवंत विद्यार्थ्यांनाही त्यांना हवी असलेली संधी उपलब्ध नाही. या चुकीच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी हा खुल्या प्रवर्गातील जनतेचा मोर्चा अमरावतीत काढण्यात आला आहे. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, असे 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे संस्थापक अनिल लाद्दड हे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

केंद्र सरकारच्या 'सबका साथ सबका विकास' या धोरणाचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. या महामोर्चामुळे बडनेराकडून अमरावती शहरात येणारी वाहतूक राजापेठ उड्डाणपुलावरून वळविण्यात आली होती.

Intro:'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' अशा घोषणा देत आज अमरावती शहरात हजारोच्या संख्येत महामोर्चा निघाला. सरकारचे अति आरक्षण धोरण हे खुल्या या प्रवर्गातील गुणवंतांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड येणारा असून यामुळे राष्ट्रहितालाही अडसर निर्माण होत आहे. शासनाने आपले धोरण बदलावे या मागणीसाठी अमरावती शहरात आज सेव्ह मिरीट सव्ह नेशन संघटनेच्यावतीने हा महामोर्चा काढण्यात आला.

Body:सेव्ह मेरिट सेनेशन चे संस्थापक अनिल लद्धड यांच्या मार्गदर्शनात दसरा मैदान येथून राजापेठ राजकमल चौक मार्गे हा महामोर्चा नेहरू मैदान येथे धडकला. या महामोर्चात हिंदू,मुस्लीम, शिख अशा सर्व धर्मातील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते .
महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या आरक्षण धोरणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. वॉट बँकेसाठी सरकार चुकीचे धोरण राबवित आहे. आज खुल्या प्रवर्गातील 2% गुणवंत विद्यार्थ्यांनाही त्यांना हवी असलेली संधी उपलब्ध नाही या चुकीच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी भारत स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदा खुल्या प्रवर्गातील जनतेचा मोर्चा अमरावतीत काढला आहे. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी असे से मेरिट सेनेशनचे संस्थापक अनिल लाद्दड हे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
दसरा मैदान इथून से मेरिट सेनेशन या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा च्या समोर चिमुकल्यांसह शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. केंद्रसरकारच्या सबका साथ सबका विकास या धोरणाचा ही यावेळी निषेध नोंदविण्यात आला मोर्चादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. या महामोर्चा मुळे बडनेराकडून अमरावती शहरात येणारी वाहतूक राजापेठ उड्डाणपुलावरून वळविण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.