ETV Bharat / state

कुलगुरूंचे दौरे संशयास्पद..! माहिती अधिकारामार्फत दौऱ्यांच्या तपशीलाची मागणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या 2 जून 2016 ते 30 डिसेंबर 2019 या कालावधीत केलेल्या दौऱ्यांबाबत माहिती मागण्यात आली आहे. यवतमाळ येथील रहिवासी सुशील सुरेश नरुले या व्यक्तीने माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागितली आहे.

कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर
कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर
author img

By

Published : Jan 17, 2020, 6:17 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती मागण्यात आली आहे. यवतमाळ येथील रहिवासी सुशील सुरेश नरुले या व्यक्तीने माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागितली आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या दौऱ्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच्या कुलगुरूंनी अशा स्वरुपाचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे विद्यापीठ पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.

कुलगुरूंचे दौरे संशयास्पद

कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्याकडे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या 2 जून 2016 ते 30 डिसेंबर 2019 या कालावधीत केलेल्या दौऱ्यांबाबत माहिती मागण्यात आली आहे. संबंधित कालावधी दरम्यान कुलगुरू चांदेकर यांनी वारंवार नागपूरला जाण्यासाठी वापरलेल्या विद्यापीठाच्या गाडीच्या लॉग बुकच्या सत्यप्रतीची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - वाशिम जिल्ह्यात 'महिलाराज'... सर्व पंचायत समितींवर महिला 'कारभारणी'

कुलगुरूंना या दौऱ्यांसाठी राज्यपालांनी मंजूर केलेल्या सुट्ट्यांचे अनुमती पत्र, शासकीय, निमशासकीय आणि इतर संस्थानी निमंत्रण दिले असल्यास, अशा निमंत्रणाच्या सत्यप्रती आणि निमंत्रण दौऱ्यांचे तपशीलही नरुले यांनी मागितले आहेत. कुलगुरू हे विद्यापीठ अनुदान आयोगासह विविध अशा 35 ते 40 समितींचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना वारंवार या समितीच्या बैठकांसाठी विद्यापीठाबाहेर राहावे लागते, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी बांधाबांध भत्त्याच्या नावाखाली 75 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. माजी कुलसचिव प्राध्यापक दिनेश जोशी यांनी स्वग्राम प्रवास योजनेअंतर्गत विद्यापीठाकडून घेतलेल्या 13 हजार रुपयांच्या प्रकरणामुळे विद्यापीठाची नामुष्की झाली होती. हे संपूर्ण प्रकरण पोलिसात जाऊन माजी कुलगुरू आणि माजी कुलसचिव यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते.

आता पुन्हा एकदा माहिती अधिकारात विद्यमान कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या दौऱ्या संदर्भात माहिती मागण्यात आल्यामुळे विद्यापीठ प्रशासन हादरले आहे. आता माहिती अधिकारात कुलगुरूंसंदर्भात सकारात्मक माहिती समोर येईल की, नकारात्मक याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro: ( exlusive)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या दौऱ्यात संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागण्यात आल्यामुळे कुलगुरूंच्या दौऱ्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच्या कुलगुरूंनी अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार केल्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठ आता नव्या वादात तर आडकणार नाही याचा धस्का विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.

Body:कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्याकडे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी 2 जून 2016 ते 30 डिसेंबर 2019 या कालावधीत केलेल्या दौऱ्याबाबत माहिती अधिकारात माहिती मागण्यात आली आहे. संबंधित कालावधीदरम्यान कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी वारंवार नागपूरला जाण्याकरिता वापरलेल्या विद्यापीठाच्या गाडीच्या लोक बुक ची सत्यप्रत मागण्यात आली आहे. तसेच 2 जून 2016 ते 30 डिसेंबर 2019 दरम्यान शासकीय निमशासकीय व इतर संस्थेने निमंत्रण दिले असल्यास अशा निमंत्रणाचा सत्यप्रती यासंबंधी केलेल्या दौऱ्याचा तपशीलही मागण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना या सर्वा दौऱ्यासाठी राज्यपालांनी मंजूर केलेल्या सुट्ट्या बाबत अनुमती दिलेल्या पत्राच्या सत्य प्रतीही यवतमाळ येथील रहिवासी असणारे सुशील सुरेश नरुले या व्यक्तीने मागितले आहे.
कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे विद्यापीठ अनुदान आयोगाचा सह विविध अशा नामांकित 35 ते 40 समितीचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना वारंवार या समितीच्या बैठकांसाठी विद्यापीठाबाहेर राहावे लागते. असे असताना त्यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती विचारून संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी बांधाबांध भत्त्याच्या नावाखाली केलेला 75 हजार रुपयांचा भ्रष्टाचार तसेच माजी कुलसचिव प्रा. दिनेश जोशी यांनी स्वग्राम प्रवास योजनेअंतर्गत विद्यापीठाकडून लागलेल्या 13 हजार रुपयांच्या प्रकरणामुळे विद्यापीठाची झालेली नामुष्की हाऊन हे संपूर्ण प्रकरण पुढे पोलिसात जाऊन माजी कुलगुरू आणि माजी कुलसचिव यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यामुळे आता पुन्हा एकदा माहिती अधिकारात विद्यमान कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या दौऱ्या संदर्भात माहिती मागण्यात आल्यामुळे विद्यापीठ प्रशासन पुन्हा एकदा हादरले आहे. आता माहिती अधिकारात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या दौऱ्यात संदर्भात सकारात्मक माहिती समोर येईल की नकारात्मक याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.