ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील 'या' गावात मृत्यूनंतर उभारली जातात लोकांची समाधी मंदिरे - Chatur Kutumb Samadhi Sawanga Vithoba

मृत्यू पावलेली व्यक्ती कदाचित संत महात्मा असेल तर भारतीय संस्कृतीनुसार वैश्विक कार्य, चमत्कार किंवा सिद्धी प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीचे एखादी समाधी किंवा मंदिर हे उभारले जाते. पण, कधी सर्वसामान्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्याचे मंदिर किंवा समाधी उभारली, असे सहसा होत नाही. परंतु, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा या गावातील एका कुटुंबातील लोकांची मात्र मृत्यू नंतर मंदिरे उभारल्या जाते.

Chatur Kutumb Samadhi Sawanga Vithoba
सावंगा विठोबा गाव नागरिक समाधी
author img

By

Published : Apr 11, 2021, 3:48 PM IST

Updated : Apr 11, 2021, 4:19 PM IST

अमरावती - व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करून त्यावर शेवटचे सोपस्कर पार पाडले जातात. अनेकांची तेरवी व दशक्रिया केली जाते. मृत्यू पावलेली व्यक्ती कदाचित संत महात्मा असेल तर भारतीय संस्कृतीनुसार वैश्विक कार्य, चमत्कार किंवा सिद्धी प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीचे एखादी समाधी किंवा मंदिर हे उभारले जाते. पण, कधी सर्वसामान्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्याचे मंदिर किंवा समाधी उभारली, असे सहसा होत नाही. परंतु, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा या गावातील एका कुटुंबातील लोकांची मात्र मृत्यू नंतर मंदिरे उभारल्या जाते.

माहिती देताना गुरुदयान चतुर, देवगुरू चतुर, कृष्णरूप चतुर

हेही वाचा - अमरावतीत आठ लाखांच्या गुटख्यासह तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंगा विठोबा गावात आजपर्यंत तबल पन्नासच्या जवळपास व्यक्तींची मंदिरे उभारली गेली आहेत. पण, मृत्यूनंतर मंदिरे उभारली जातात, असे हे एकमेव गाव असल्याचा दावाही केल्या जातो. हे मंदिर उभारण्यामागेही एक इतिहास आहे.

सावंगा विठोबा हे संत कृष्णाजी महाराज यांचे देवस्थान आहे. या देवस्थानात दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. गुढीपाडव्याच्या सणाला येथे मोठा उत्सव असतो. राज्यातील लाखो भाविक येथे हजेरी लावतात. लाखो रुपयांचा कापूर त्या दिवशी येथे जाळला जातो. साधारनत: शेकडो वर्षांपूर्वी संत कृष्णाजी चतुर महाराज हे सावंगा विठोबा येथे आल्याचे येथील चतुर कुटुंबातील लोक सांगतात. कृष्णाजी महाराज यांच्या पश्चात त्यांना पाच मुले होती. त्यातील दोन मुलांच्या समाधी जवळच असलेल्या चिरोडी या गावात आहेत. तर, तीन मुलांच्या समाधी सावंगा विठोबा येथील स्मशानभूमीमध्ये आहेत.

संत कृष्णाजी महाराज यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी, माझे काम चतुर कुटुंब पाहिल, असे सांगितले होते. संत कृष्णाजी महाराज यांच्या निधनानंतर पूजा-अर्चना करिता येणारे भाविक हे चतुर कुटुंबाकडे आपली व्यथा, दुःख, आजार घेऊन जातात. त्यावेळेस त्यांना चतुर कुटुंबातील सदस्य हे मार्गदर्शन करतात. ज्या लोकांचे आजार बरे होतात, ते लोक मग आमच्या कुटुंबातील लोकांना देव मानतात. आमच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावे मंदिर बांधून तेथे पूजा करत असल्याची माहिती चतुर कुटुंबातील सदस्यांनी दिली.

कृष्णाजी महाराज यांचे वंशज असल्याने चतुर कुटुंबाला विशेष मान

संत कृष्णाजी महाराज यांचे आडनाव चतुर होते. आपण गेल्यानंतर आपला कारभार चतुर कुटुंब सांभाळेल, ते समाजासाठी काम करू शकतात, असे कृष्णाजी महाराज यांनी सांगितले असल्याचा दावा चतुर कुटुंब करतात. त्यामुळे, येथे येणारे भाविक हे चतुर कुटुंबाचे मार्गदर्शन घेतात व त्यांना देव मानतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर त्यांना दान करतात, तर अनेकजण चतुर कुटुंबातील कुण्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्या नावाने समाधी, मंदिर बांधून देतात.

मानासिक आजार दूर होत असल्याचा दावा

सावंगा विठोबा येथे संत कृष्णाजी महाराज यांची समाधी आहे. येथे येणाऱ्या दुःखी, आजारी लोकांचे आजार बरे होत असल्याचा दावा केला जातो. या गावातील चतुर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा कृष्णाजी महाराज यांच्या आज्ञेनुसार काम करतो. कृष्णाजी महाराज यांचा चतुर कुटुंबातील लोकांना आशीर्वाद आहे. त्यामुळे, आमच्या हातून चांगले कार्य घडते. त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की ते मंदिर बांधून देत असल्याचे गुरूदयान चतुर यांनी सांगितले.

चतुर कुटुंबाला देवत्व प्राप्त झाल्याची भाविकांची भावना

कृष्णाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे आशीर्वाद हे चतुर कुटुंबाला आहे. त्यामुळे, चतुर कुटुंबाला देवत्व प्राप्त झाले आहे, अशी भावना भाविकांची आहे. येथे येणारे भाविक हे चतुर कुटुंबाला देव मानतात आणि त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी मंदिरे उभारून देतात, असे समजले.

हेही वाचा - भाजपा पदाधिकाऱ्याचा महिला बस वाहकासोबत वाद, व्हिडिओ व्हायरल

Last Updated : Apr 11, 2021, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.