ETV Bharat / state

अमरावती बसस्थानकातील पाणपोई भागवते २५ हजार प्रवाशांची तहान.. - welfare

अमरावतीतील या पाणपोईस ३० वर्षे झाली आहेत. विदर्भातील सर्वात मोठी पाणपोई कुठली असेल तर अमरावतीची असे म्हणणं वावग ठरणार नाही.

अमरावती बसस्थानकातील पाणपोई भागवते २५ हजार प्रवाशांची तहान..
author img

By

Published : Apr 24, 2019, 2:29 PM IST

अमरावती - रणरणत्या उन्हात तहान लागल्यास पाणी पिण्याची तीव्र इच्छा होते. त्यात प्रवास करताना रांजणातील थंड पाणी प्यायला मिळाल्यास मन तृप्त होते. अशाच तहानलेल्या प्रवाशांची तहाण भागवण्याचे काम अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील पाणपोई करत आहे.

सातत्याने ३० वर्षांपासून १११ रांजन असलेली पाणपोई सुमारे २५ हजार प्रवाशांना मोफत थंड व शुद्ध पाणी पाजते. श्री संत सितारामदास बाबा चॅरिटेबल ट्रस्टकडून ही भव्य पाणपोई चालवली जाते.

अमरावती बसस्थानकातील पाणपोई भागवते २५ हजार प्रवाशांची तहान..

अमरावती येथील सुनेलालजी मंत्री यांनी १९८९ मध्ये या पाणपोईची स्थापना केली होती. पालदास राठी सांगतात, मी सहा वर्षांपासून येथे कार्यरत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नामवंत व्यक्तीकडून पाणपोईचे उद्घाटन केले जाते. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह मोठ्या उच्च पदावर विराजमान असलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी येथे उद्घाटनाला आले आहेत.

एकूण १११ रांजण असलेल्या या पाणपोईमध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी तीन महिने १२५ स्वयंसेवक काम करत असतात. येथे दरवर्षी नवीन रांजण विकत आणले जातात. पाणपोई बंद झाली की गरजूंना रांजण मोफत दिले जाते. एसटीबसमधील चालक वाहकांना विशेष सोय म्हणून पाच लिटरच्या कॅनमध्ये त्यांना पाणी दिले जाते.

Intro:विदर्भातील सर्वात मोठी 111 राजनांची पाणपोई अमरावती बसस्थानकात.

दरोरोज 25 हजार प्रवाशांची भागवते तहान.

तीस वर्षपासून उपक्रम सुरू.

-----------------------------------------------

  अमरावती अँकर

उन्हाळा तापला की प्रत्येक जिवाच्या घशाला कोरड पडते. रगरगत्या उन्हात मोफत आणि थंड पाणी मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते .वरून सूर्य आग ओकत असताना जीवाची लाही लाही होते .पाणी पाणी करणाऱ्या प्रवाशाच्या घशाची तहान अमरावती मध्यवर्ती बसस्थानकांतील पाणपोई भागवते अशी पाणपोई की सातत्याने 30 वर्षपासून ती सेवा देते 111 राजनांची असलेली पाणपोई दररोज 25 हजार प्रवाशांना मोफत थंड व शुद्ध पाणी पाजते. यावर्षी या पाणपोई ला तीस वर्षे झाली असून विदर्भातील सर्वात मोठी पाणपोई कुठली असेल तर अमरावतीची अस म्हणायला वावग ठरणार नाही.

श्री संत सितारामदास बाबा चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती कडून ही भव्य पाणपोई चालवली जाते. अमरावती येथील सुनेलालजी मंत्री यांनी 1989 मध्ये या पाणपोई ची स्थापना केली होती.यावर्षी तिला तीस वर्षे पूर्ण झाले आहे.गोपालदास राठी सांगतात मी सहा वर्षा पासून येथे कार्यरत आहे.दरवर्षी गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या नामवंत व्यक्ती कडून या पाणपोई चे उटघाटन केले जाते .जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सह मोठ्या उच्च पदावर विराजमान असलेले लोकप्रतिनिधी ,अधिकार येथे उटघाटनाला आले आहे.एकूण 111 रांजण असलेल्या या पाणपोई मध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी तीन महिने 125 सेवाधरी सेवाभावाणे  काम करत असतात.अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील 25 हजार प्रवाशी या पाणपोईत दरोरोज आपली तहान भागवतात.दरवर्षी येथे नवीन रांजण हे विकत आणतात पाणपोई बंद झाली की गोरगरीब कुटुंबाना ते रांजण मोफत दिल्या जाते.जिथे ही पाणपोई स्थापित केली आहे तो परिसर स्वच्छ असून तीन वेळा पाणी गाळल्या नंतरच ते प्रवाशाना दिले जाते.दरवर्षी 30 हजार नवीन  बॉटल  या पाणी भरून प्रवाशाना दिल्या जाते तर तीन महिन्यात 60 हजार लोकांच्या बॉटल मध्ये पाणी भरून दिल्या जाते.एस टी बस मधील चालक वाहकांना विशेष सोय म्हणून पाच लिटरची कॅन मध्ये त्यांना पाणी दिल्या जाते .एकंदरीत 111 मोठ्या राजनमध्ये 15 हजार लिटर पाणी साठवल्या जात असून दरोरोज एवढे पाणी प्रवाशांना वितरित केले जाते.
खेड्यापाड्या वरून ,ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशा साठी ही पाणपोई एक हक्कची तृष्णा तृप्ती ठरत असून प्रवाशी समाधान व्यक्त करतात

बाईट -गोपालदास राठी
बाईट-प्रवाशीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.