अमरावती - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (गुरूवारी) शहरात ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये शहर आणि जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींकडून लोहपुरुषाला अभिवादन, स्टॅच्यू ऑफ युनिटीला वाहिली पुष्पांजली
जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार यांनी या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणि देशाचे माजी गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्वांना एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावर्षी ही दौड विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी 8 वाजता सुरु झाली. यावेळी जिल्हा शिक्षण अधिकारी नीलिमा टाके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते.