ETV Bharat / state

अमरावतीच्या माजी नगरसेवकाच्या घरात चोरी, चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास - अमरावती

पत्नी आणि मुलासह कोकणात फिरायला गेलेले माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांचे घर चोरट्यांनी फोडले आणि लाखोंचा ऐवज लंपास केला. माजी नगरसेवकाच्या घरात चोरी झाल्यामुळे शंकरनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांचे फोडलेले घर
author img

By

Published : Jun 11, 2019, 11:53 PM IST

अमरावती - कोकणात फिरायला गेलेल्या माजी नगरसेवकाचे घर फोडून 1 लाख 36 हजार रोखसह एकूण पावणे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने पळविला. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शंकरनगर परिसरात ही घटना घटली.

चोरट्यांनी लंपास केलेल्या ऐवज संबंधी माहिती देतांना माजी नगरसेवक मुन्ना राठोड

काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड हे पत्नी आणि मुलासह कोकणात फिरायला गेले होते. मंगळवारी सकाळी ते अमरावतीला परत येत असताना शेजारी राहणाऱ्या भुसारी यांचा तुमच्या घराचे दार उघडे आहे, असा फोन आला. यानंतर मुन्ना राठोड यांनी लगेच त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधून त्याला घरी पाठवले तसेच राजपेठ पोलीस ठाण्यालाही माहिती दिली.

चोरट्याने राठोड यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. ज्या खोलीत कपाट आहे. त्या खोलीचे दार तोडून खोलीत प्रवेश केला. कपाटातील 1 लाख 36 हजार रोख, आयपॅड, दोन मोबाईल फोन, सोन्याचे कानातील दागिने, चांदीच्या तोरड्या यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डेटा, व्हिडिओ रेकॉर्डर आणि सेट-टॉप बॉक्सही चोरट्याने पळविला.

या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. माजी नगरसेवकाच्या घरात चोरी झाल्यामुळे शंकरनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Intro:कोकणात फिरायला गेलडल्या माजी नगरसेवकाचे घर फोडून 1 लाख 36 हजार रोखेसह एकूण पावणे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने पळविला. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शंकरनगर परिसरात ही घटना आज समोर आली.

Body:काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड हे पत्नी आणि मुलासह कोकणात फिरायला गेले होते. आज सकाळी ते अमरावतीला परत येत असताना शेजारी राहणाऱ्या भुसारी यांनी तुमच्या घराचे दार उघडे आहे असा फोन आला. यानंतर मुन्ना राठोड यांनी लगेच त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधून त्याला घरी पाठवले तसेच राजपेठ पोलीस स्टेशनलाही माहिती दिली.
चोरट्याने राठोड यांच्या दराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत कपाट आहे त्या खोलीचे दार तिडून खोलीत प्रवेश केला. कपाटातील 1 लाख 36 हजार रोख, आय पॅड, दोन मोबाईल फोन, सोन्याचे कानातले, चांदीच्या तोरड्या यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डाटा व्हिडिओ रेकॉर्डर आणि सेंटटॉप बॉक्सही चोरट्याने पळविला. या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यात आली असून माजी नगरसेवकाच्या घरात चोरी झाल्यामुळे शंकरनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.