ETV Bharat / state

रस्ते निर्मितीदरम्यान फसला ट्रॅक्टर; कंत्राटदाराने ट्रॅक्टरसकट केले काँक्रीटीकरण

author img

By

Published : Jan 9, 2021, 11:30 AM IST

Updated : Jan 9, 2021, 12:12 PM IST

रस्त्याचे बांधकाम सुरू असताना आम्ही ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर हटविण्याच्या वारंवार सूचना दिल्या. त्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाला पण दिली. तरीसुद्धा ट्रॅक्टर हटविण्यात आला नाही. उलट त्यांनी आधी ट्रॅक्टरसह रस्त्याचे बांधकाम करा नंतरच आम्ही ट्रॅक्टर हटवू असे सांगितले.

रस्ते निर्मितीदरम्यान फसला ट्रॅक्टर; कंत्राटदाराने ट्रॅक्टरसकट केले काँक्रीटीकरण
रस्ते निर्मितीदरम्यान फसला ट्रॅक्टर; कंत्राटदाराने ट्रॅक्टरसकट केले काँक्रीटीकरण

अमरावती- जिल्ह्यातील धारणी शहरात नगरपंचायत रस्ता बांधणीत अडचण ठरणाऱ्या ट्रॅक्टरसह काँक्रीटीकरण करण्यात आल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. शहरात सध्या प्रशासनाद्वारे गुजरी बाजार निर्मितीसाठी बाजार ओटे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामात मधोमध उभा असलेला एक ट्रॅक्टर अडचण ठरत होता. मात्र, मालकाने तो टॅक्टर हलवण्यास नकार दिला. परिणामी कंत्राटदाराने ट्रॅक्टरसह रसत्याचे काँक्रीटीकरण केले. हा प्रकार पाहण्साठी नागरिकांनी गर्दी केली होती.

रस्ते निर्मितीदरम्यान फसला ट्रॅक्टर; कंत्राटदारने ट्रक्टरसकट केले काँक्रीटरण

अन् कंत्राटदाराने ट्रॅक्टसह केले रस्त्याचे काँक्रीटरण
धारणी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वादग्रस्त सर्वे न 126 वर मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण धारकांनी आपली दुकानं थाटून जागा हडपली आहे. नगरपंचायत महसूल तहसील आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्या जागेवरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी गुजरी बाजाराची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी बाजार ओटे आणि रसत्यांची बांधणी सुरु आहे. या बांधकामादरम्यान रस्त्याच्या मध्ये डॉ. रमीज याचा ट्रॅक्टर उभा होता. कंत्राटदाराने त्यांना ट्रॅक्टर हटविण्याची विनंती केली. मात्र, ट्रॅक्टर हलवण्यासाठी रमजी यांनी नकार दिला. अखेर कंत्राटदाराने ट्रॅक्टरसह रसत्याचे काँक्रीटरण केले. या प्रकाराबाबत रमजी यांनीही कोणताही आक्षेप नोंदवला नाही. चक्क ट्रॅक्टरसह रास्ता काँक्रीट झाल्याने धारणीत हा विषय कुतूहलाचा झाला आहे. काँक्रीटीकरण झालेल्या सत्यावर फासलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

ट्रॅक्टर मालकाच्याच सांगण्यावरून केले काँक्रीटीकरण

रस्त्याचे बांधकाम सुरू असताना आम्ही ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर हटविण्याच्या वारंवार सूचना दिल्या. त्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाला पण दिली. तरीसुद्धा ट्रॅक्टर हटविण्यात आला नाही. उलट त्यांनी आधी ट्रॅक्टरसह रस्त्याचे बांधकाम करा नंतरच आम्ही ट्रॅक्टर हटवू असे म्हणटल्याचे कंत्राटदार मो शॉकत मो शकुर यांनी सांगितले.

Last Updated : Jan 9, 2021, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.