अमरावती - नाळ या मराठी चित्रपटात खास भूमिका साकारत महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला अमरावती मधील बाल कलाकार चैत्या उर्फ श्रीनीवास पोकळे हा 'मेडली पार्ट-२' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही दिवसापूर्वी लंडनमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू याच्यासोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, या दोघांचाही लंडनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चैत्या आणि रिंकू हे कधी क्रिकेट तर कधी लंडनमधील प्रसिद्ध अशा थेम्स नदी काठी निवांत वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहेत.
आधीपासूनच मस्तीखोर असलेला चैत्या लंडनमध्ये देखील मस्ती करताना दिसत आहे. लंडनमधील हिथ्रो एअर पोर्टपासून 15 मिनिटांच्या अंतरावर थेम्स नदीच्या किनारी या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - पिंगळा देवीवर हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रद्धा ; मशिदीसारखा मंदिराचा घुमट
हेही वाचा - मेळघाटात आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार; भाजपा करणार ठिय्या आंदोलन