अमरावती - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 1 मे पर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीमध्ये या निर्बंधांना नागरिक कशाप्रकारे प्रतिसाद देत आहेत? सकाळी 11 नंतर सरकारच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद होतात का? याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी.
भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी
दरम्यान अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे, तरी देखील भाजीमंडईमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. परंतु 11 नंतर भाजीमंडईमधील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद केली. शहरातील पठाण चौक आणि ट्रान्सपोर्ट नगरमध्ये मात्र काही दुकाने सुरू होती.
हेही वाचा - शरद पवारांच्या तोंडातील अल्सर काढला, तब्येत ठणठणीत - नवाब मलिक