ETV Bharat / state

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने केली आत्महत्या - amravati latest news

अमरावती जिल्ह्यातील येवदा गावात एका नराधमाने अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याने ती तरुणी गर्भवती राहली होती. त्यामुळे बदनामी होईल या भीतीने या तरूणीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविले आहे.

rape on miner girl in Amravati, girl commented suicide
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहल्याने केली आत्महत्या
author img

By

Published : Sep 11, 2021, 4:11 PM IST

Updated : Sep 11, 2021, 4:45 PM IST

अमरावती - मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर एका नराधमाने दोन दिवसांपूर्वी बलात्कार करून तिच्या गुप्तांगात अमानुषपणे रॉड घातल्याची संतापजनक घटना समोर आली होती. यातील पीडित महिलेचा आज मृत्यू देखील झाला आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरातील ही घटना ताजी असतानाच अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याने ती तरुणी गर्भवती राहली होती. त्यामुळे बदनामी होईल या भीतीने या तरूणीने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे.

प्रतिक्रिया - सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील

बदनामीच्या भीती पोटी केली आत्महत्या -

अमरावती जिल्ह्यातील येवदा गावात ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. महिला लोकप्रतिनिधींच्या जिल्ह्यातच महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आला आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले होते. अल्पवयीन ही १७ वर्षाची आहे. यातून अल्पवयीन ७ महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणार - गृहमंत्री

Last Updated : Sep 11, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.