ETV Bharat / state

अमरावती विभागातील पीक धोक्यात; नैसर्गिक पावसाची प्रतीक्षा, कृत्रिम पावसाचाही विचार - पीक

यावर्षी 20 जूननंतर अमरावती विभागात मान्सूनचे आगमन झाले. तब्बल 13 दिवसांनी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले. आता शेतात आलेले पीक तग धरून राहाण्यासाठी एक दोन दिवसात पाऊस पडणे हाच पर्याय आहे.

अमरावती विभागातील पीक धोक्यात; नैसर्गिक पावसाची प्रतीक्षा, कृत्रिम पावसासाचाही विचार
author img

By

Published : Jul 16, 2019, 8:53 AM IST

अमरावती - विभागात 15 जुलैपर्यंत 276.1 मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात 167 मिमी पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहे. आता 20 किंवा 21 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतात बोटभर उगवलेले पीक हातभर होण्याची आशा आहे. मात्र, पावसाने जर यावेळीही दगा दिला तर कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार अमरावती विभागात केला जात आहे.

यावर्षी 20 जूननंतर अमरावती विभागात मान्सूनचे आगमन झाले. तब्बल 13 दिवसांनी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले. आता शेतात आलेले पीक तग धरून राहाण्यासाठी एक दोन दिवसात पाऊस पडणे हाच पर्याय आहे.

अमरावती विभागातील पीक धोक्यात; नैसर्गिक पावसाची प्रतीक्षा, कृत्रिम पावसासाचाही विचार

अमरावती विभागात एकूण 777.9 मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे. यापैकी 15 जुलैपर्यंत 276.1 मिमी पाऊस पडायला हवा असताना 167.0 मिमी इतकाच पाऊस पडला असल्याने पीक परिस्थिती गंभीर आहे.

विभागात अमरावती जिल्ह्यात आजपर्यंत 279.8 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 157.5 मिमी पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात 257.1 मिमी पाऊस हवा असताना 175.5 मिमी. पाऊस पडला यवतमाळ जिल्ह्यात 324.9 मिमी पाऊस हवा असताना केवळ 127.0 मिमी पाऊस बरसला, बुलडाणा जिल्ह्यात 288.8 पाऊस अपेक्षित असताना 160.5 मिमी पाऊस झाला तर वाशिम जिल्ह्यात 276.1 मिमी. इतका पाऊस आजपर्यंत बरसायला हवा असताना केवळ 160.5 मिमी पाऊस झाला आहे.

हवा तसा पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे. पश्चिम विदर्भात महत्वाचे पीक असणाऱ्या कापसाची लागवड 90 टक्के झाली असून सोयाबीनची पेरणी 72 टक्के झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 96 टक्के कापसाची लागवड झाली असून सोयाबीनची पेरणी 48 टक्के झाली आहे. अकोला जिल्ह्यात कापसाची लागवड 86 टक्के तर सोयाबीनची पेरणी 64 टक्के झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कापसाची लागवड 93 टक्के तर सोयाबीनची 90 टक्के पेरणी आटोपली, यवतमाळ जिल्ह्यात कापसाची लागवड 72 टक्के तर सोयाबीनची पेरणी 93 टक्के झाली आहे आणि वाशिम जिल्ह्यात कापसाची लागवड 68 टक्के आणि सोयाबीनची पेरणी 89 टक्के झाली आहे.

संपूर्ण अमरावती विभाग कापूस आणि सोयाबीन या पिकांसह बाजरीची पेरणी 8 टक्के झाली. तर, तुरीची 76 टक्के पेरणी झाली. वाशिम जिल्ह्यात तुरीची पेरणी 100 टक्के तर बुलडाणा जिल्ह्यात 95 टक्के पेरणी झाली आहे. भुईमुगाची पेरणी विभागात 35 टक्के झाली. तिळाची 43 टक्के पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची पेरणी केवळ 24 टक्के आहे. ऊसाची लागवड बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्हा मिळून 2 टक्के आहे. भाताची केवळ अमरावती जिल्ह्यात 20 टक्के लागवड झाली आहे.

विभागात बुलडाणा जिल्ह्यात तुलनेने बऱ्यापैकी पाऊस आहे. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर भागात पाऊस नसल्याने पिके धोक्यात आहे. अमरावती विभागात मेळघाटातील धारणी चिखलदरा या भागात चांगला पाऊस असल्याने पिकांची स्थितीही चांगली आहे. अकोट, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या खरपट्ट्यात परिस्थिती भीषण आहे. यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी, पांढरकवडा, कळंब या भागातही पीक परिस्थिती कठीण आहे.

अमरावती विभागात 20 जुलैनंतर पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाने ओढ दिली तर कृत्रिम पाऊस कसा पाडता येईल याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

अमरावती विभागातील पीक परिस्थिती सध्या चांगली आहे. काही भागात परिस्थिती नाजूक असली तरी आता 20 जुलैपासून पाऊस कोसळणार, असा अंदाज असल्याने परिस्थिती आटोक्यात येईल, असे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार वरुणराजा बरसतो की कृत्रिम पावसाद्वारे भीषण संकटांवर मात करावी लागेल, हे आता 20 जुलैनंतरच स्पष्ट होणार आहे.

Intro:अमरावती विभागात 15 जुलै पर्यंत 276.1 मी.मि. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 167.मी. मि. पाऊस बरसल्याने खरीप हंगामातील पीक परिस्थिती चांगलीच धोक्यात सापडली आहे. आता 20 किंवा 21 जुलै पासून मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने शेतात बोटभर उगवलेले पीक हातभार होण्याची आशा आहे. पावसाने जर यावेळीही दगा दिला तर कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार अमरावती विभागात केला जातो आहे.

Body:यावर्षी 20 जून नंतर अमरावती विभागात मान्सूनचे आगमन झाले. तब्बल 13 दिवसांनी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले. याचा परिणाम थेट शेतीवर झाला असून हवा तसा पाऊस पडला नसल्याने आता शेतात आलेले पीक तग धरून राहाण्यासाठी एक दोन दिवसात पाऊस पडणे हाच पर्याय आहे.
अमरावती विभागात एकूण 777.9 मी. मि. सरासरी पाऊस अपेक्षित आहे. यापैकी 15 जुलै पर्यंत 276.1 मी. मि पाऊस पडायला हवा असताना 167.0 मी. मि इतकाच पाऊस पडला असल्याने पीक परिस्थिती गंभीर आहे.
विभागात अमरावती जिल्ह्यात आज पर्यंत 279.8 मी. मि पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 157.5 मी. मि पाऊस झाला.अकोला जिल्ह्यात 257.1 मी. मि पाऊस हवा असताना 175.5 मी. मि पाऊस पडला यवतमाळ जिल्ह्यात 324.9 मी. मि. पाऊस हवा असताना केवळ 127.0 मी. मि पाऊस बरसला, बुलडाणा जिल्ह्यात 288.8 पाऊस अपेक्षित असताना 160.5 मी. मि पाऊस झाला तर वाशिम जिल्ह्यात 276.1 मी.मि. इतका पाऊस आजपर्यंत बरसायला हवा असताना केवळ 160.5 मी. मि. पाऊस झाला आहे.
हवा तसा पाऊसच झाला नसल्याने त्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे.पश्चिम विदर्भात महत्वाचे पीक असणारे कापूसाची पेरणी 90 टक्के झाली असून सोयाबीनची पेरणी 72 टक्के झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 96 टक्के कापसाची पेरणी झाली असून सोयाबीनची पेरणी 48 टक्के आहे. अकोला जिल्ह्यात कापसाची पेरणी 86 टक्के तर सोयाबीनची पेरणी 64 टक्के झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कापूस 93 टक्के तर सोयाबीनची 90 टक्के पेरणी आटोपली, यवतमाळ जिल्ह्यात कापसाची 72 टक्के तर सोयाबीनची पेरणी 93 टक्के झाली आहे आणि वाशिम जिल्ह्यात कापसाची पेरणी 68 टक्के आणि सोयाबीनची पेरणी 89 टक्के झाली आहे.
कापूस आणि सोयाबीन या पिकांसह बाजरीची संपूर्ण अमरावती विभाग 8 टक्के पेरणी झाली, तुरीची 76 टक्के पेरणी झाली. वाशिम जिल्ह्यात तुरीची पेरणी 100 टक्के तर बुलडाणा जिल्ह्यात 95 टक्के पेरणी झाली आहे. भुईमुंगची पेरणी विभागात 35 टक्के आहे.तिळाची 43 टक्के पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची पेरणी केवळ 24 टक्के आहे.उसाची पेरणी बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्हा मिळून 2 टक्के आहे. भाताची केवळ अमरावती जिल्ह्यात 20 टक्के पेरणी झाली,
विभागात बुलडाणा जिल्ह्यात तुलनेने बऱ्यापैकी पाऊस आहे. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर भागात पाऊस नसल्याने पीक परिस्थिती धोक्यात आहे. अमरावती विभागात मेळघाटातील धारणी चिखलदरा या भागात चांगला पाऊस असल्याने पिकांची स्थितीही चांगली आहे. अकोट, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या खरपट्ट्यात परिस्थिती भीषण आहे. यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी, पांढरकवडा, कळंब या भागातही पीक परिस्थिती कठीण आहे.
दरम्यान अमरावती विभागात 20 जुलै नंतर पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जर पावसाने धोका दिला तर कृत्रिम पाऊस कसा पडता येईल याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
अमरावती विभागातील पीक परिस्थिती सद्या चांगली आहे. काही भागात परिस्थिती नाजूक असली तरी आता 20 जुलै पासून पाऊस कोसळणार असा अंदाज असल्याने परिस्थिती आटोक्यात येईल असे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे 'ईटीव्ही भारता' शी बोलताना म्हणाले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार वरुणराजा बरसतो की कृत्रिम पावसाद्वारे भीषण संकटांवर मात द्यावी लागेल हे आता 20 जुलै नंतरच स्पष्ट होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.