अमरावती : अमरावती शहरातील रेल्वे वॅगन कारखाना ( Railway Wagon Factory ) दुरुस्तीचे काम मध्यंतरी अतिशय संथगतीने सुरू असताना आता मात्र या कामाला वेग आला आहे. 31 डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिन्याला 180 रेल्वे वॅगन तयार करण्याची क्षमता असणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव या प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते होईल असे देखील आता सांगितले जात आहे.
असा आहे हा प्रकल्प : अमरावती शहर आणि जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असणारा रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्प हा बडनेरा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणाऱ्या काटआमला ते उत्तमसरा दरम्यान साकारला जातो आहे. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमरावती शहरात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखानाला मंजुरी दिली होती. सुमारे 245 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला यावेळी या वॅगन कारखान्यासाठी मान्यता देण्यात आली होती.
वॅगन दुरुस्तीसाठी एकूण पाच शेड तत्कालीन खासदार आनंद अडसूळ यांनी देखील यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. 2016 17 मध्ये वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या कामाला सुरुवात झाली होती. या प्रकल्पासाठी परिसरातील 85 हेक्टर जमीन परिसरातील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीवर वॅगन दुरुस्ती कारखान्यासोबतच कारखान्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान तसेच विश्रामगृह देखील उभारण्यात आले आहे. यासह रेस्ट रूम आणि हॉटेल देखील बांधण्यात आले आहे. वॅगन दुरुस्तीसाठी एकूण पाच शेड तयार करण्यात आले असून या ठिकाणी पीट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे पूर्ण झाली आहेत. पाच पैकी एका शेडमध्ये सध्या ड्रॅगन दुरुस्ती चे ट्रायल घेतले जात आहे.
5000 कामगारांना मिळणार रोजगार : सध्य स्थितीत पाच पैकी एका शेडमध्ये वॅगन दुरुस्तीचे ट्रायल घेतले जात आहे. या एका शेडमध्ये आज 1000 कामगार काम करीत असून यामध्ये खाली कामगारांसह मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या कामगारांचा समावेश आहे. वेगन दुरुस्ती कारखान्याचे काम पूर्ण होताच या ठिकाणी एकूण पाच हजारापेक्षा अधिक कामगारांना रोजगार मिळणार आहे. यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
जुने इंजिन वाढवत आहे परिसराची शोभा : पंचतारांकित भासावे असा वेगन दुरुस्ती कारखान्याचा परिसर असून या ठिकाणी मुख्य द्वारा लगतच रेल्वेचे जुने इंजिन रंगरंगोटी करून ठेवण्यात आले आहे. अतिशय सुंदर दिसणारे हे जुने इंजिन परिसराची शोभा वाढवित आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन : अमरावती येथील रेल्वे व्याकर दुरुस्ती कारखान्याच्या पहिल्या टप्प्यातील काम 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. यानंतरचा टप्पा जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष आणि एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली. अमरावती साठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या रेल्वे व्याधीन दुरुस्ती कारखान्यात चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीने करतील अशी माहिती देखील किरण पातुरकर यांनी दिली आहे.