ETV Bharat / state

Shiv Mahapuran Katha : मालखेडच्या जंगल परिसरात 'शिव महापुराण कथा सोहळा'; तर शहरात बिबट्याचा धुमाकूळ

Shiv Mahapuran Katha: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या माध्यमातून हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीनं 16 ते 20 डिसेंबर दरम्यान मालखेडच्या जंगल परिसरात (Malkhed Forest Area) प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांच्या शिव महापुराण कथेचं (Shiv Mahapuran Katha) आयोजन करण्यात आलं आहे.

Pradeep Mishra
शिव महापुराण कथेचे आयोजन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 9:40 PM IST

Updated : Oct 28, 2023, 9:58 PM IST

अमरावती Shiv Mahapuran Katha : अमरावती शहरातील विलासनगर, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या भागात बिबट्या (Leopard) धुमाकूळ वाढलेली आहे. शहरालगत असणाऱ्या पोहरा मालखेड जंगलात (Malkhed Forest Area) प्रवचनाच्या तयारीसाठी सुमारे दहा ते बारा एकर जमिनीवर पसरलेली झाडं-झुडपं नष्ट केली जात आहे. ज्या भागात झाडझुडपं कापल्या जात आहे ती जागा खाजगी असली तरी तो संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. त्या भागात बिबटसह अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे. दीड वर्षांपूर्वी या भागात वाघाचं देखील वास्तव्य होतं. एकीकडे शहरात बिबट्या धुमाकूळ घालीत असताना प्रवचनासाठी हे जंगल साफ केलं जात आहे. तर या जंगल तोडीमुळे भविष्यात ओढाविणाऱ्या समस्यांबाबतचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

प्रवचनासाठी जंगलात जोरदार तयारी : प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या (Shiv Mahapuran Katha) सोहळ्याला विदर्भातून पाच लाखाच्यावर भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा सोहळा मालखेड मार्गावर असणाऱ्या घनदाट जंगल परिसरात होणार आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वतीनं हनुमान चालीसा ट्रस्टला नुकत्याच 20 ऑक्टोबरला 10 एकर जागा दान केली. त्याच जागेवर प्रदीप मिश्रा यांचं प्रवचन होणार आहे. जंगलचा परिसरात प्रचंड प्रमाणात झाडं झुडपं होती. ही सर्व झाडझुडप एकूण पाच ते सहा जेसीबी लावून काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या ठिकाणी लवकरच 111 फूट उंच श्री हनुमानाची मूर्ती देखील स्थापन केली जाणार आहे. एकंदरीत सध्या प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांच्या शिव महापुराण कथेसाठी या जागेवर जोरदार तयारी सुरू आहे.

जंगल तोड विरोधात रोष : ज्या भागात प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन होणार आहे तो संपूर्ण परिसर घनताट जंगलाने वेडला आहे. त्या ठिकाणी बिबट, अजगर, मोर, खवल्या मांजर, काळवीट, चिंकारा, हरीण, निलगाय आदी अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी आहेत. जंगलात कुठल्याही कार्यक्रमानिमित्त तसेच अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरू आहे. यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला असल्यासंदर्भात, वाईल्ड लाईफ वेल्फेअर रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कंचनपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. या जंगल भागात असणाऱ्या वन्य प्राण्यांना मानवी हस्तक्षेपामुळे धोका निर्माण होणार नाही, यासाठी वन विभागाने काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा असल्याचे निलेश कंचनपुरे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

जंगलाऐवजी शहरात व्हावे प्रवचन : या जंगलातून आठ दिवसांपूर्वी सायल हा प्राणी (Porcupine Animal) नागरी वसाहतीत आढळून आला होता. तसेच बिबट्या देखील अमरावती शहरातील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात ठाण मांडून आहे. जंगलात माणसांचा गोंधळ वाढला तर जंगली प्राणी अमरावती शहराकडे धाव घेतील. यामुळे एक तर माणसांना किंवा त्या जंगली प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असल्याचं वनसंरक्षक डॉ.जयंत वडकरी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. मालखेड मार्गावर खाजगी जमिनीवर कार्यक्रम असला तरी तो जंगल परिसर आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या हजारो लाखो लोकांमुळे जंगलातील प्राणी निश्चितच डिस्टर्ब होणआर आहेत. असे कार्यक्रम शहरापासून दूर जंगलात घेण्याऐवजी अमरावती शहरात घ्यायला हवेत.

निसर्गप्रेमी भगवान शिवांच्या तत्त्वांची व्हावे पालन : भगवान शिव हे स्वतः निसर्गप्रेमी आहेत. नागपंचमी सारखे सण आपण साजरे करतो. शंकराच्या गळ्यात देखील नाग असतो. खरंतर भगवान शिव हे निसर्गातील प्रत्येक घटकांचे आपण संवर्धन करायला हवं, त्यांच्यावर प्रेम करायला हवं असाच संदेश देतात. यामुळेच आपल्या कुठल्याही कृत्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घेणं आवश्यक आहे. सध्या जंगलामध्ये माणसांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे जंगलातील प्राणी नागरी वसाहतींकडे धाव घेत आहेत. असे कार्यक्रम जंगला ऐवजी शहरात घेतला तर त्याचा अधिक लोकांना लाभ होईल. आयोजकांचा हेतू निश्चितच खूप चांगला आणि स्वच्छ आहे. मात्र निसर्गातील प्राणीमात्रांवर दया हा भगवान शिवांचा मूळ संदेश देखील आपण समजून घ्यायला हवा. 'जिओ आणि जिने दो' या तत्त्वावर आपण वागायला हवं असं देखील यादव तरटे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Ekal Vidyalaya Abhiyan : मेळघाटात 330 गावांमध्ये एकल विद्यालय; 6 हजारावर विद्यार्थ्यांना देतात संस्कृतीचे धडे
  2. Navratri २०२३ : राज्यातील 'या' देवीच्या मंदिरात दररोज पाच हजार भाविक घेतात महाप्रसादाचा लाभ
  3. Leopard strays into Amravati : बिबट्याचा दोन दिवसांपासून अमरावतीत मुक्काम; पकडण्याकरिता वनविभागासह पोलिसांचा बंदोबस्त

माहिती देताना प्रतिनिधी

Last Updated : Oct 28, 2023, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.