अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. मुरलीधर चांदेकर (former vice chancellor) यांचा कार्यकाळ 1 जूनला संपुष्टात आल्यावर आज (बुधवार) प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला लागलेले ग्रहण सुटले, अशा शब्दात डॉ. चांदेकर यांचा निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होमही पेटवला. आता अमरावती विद्यापीठाला चांगले कुलगुरू मिळावेत, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा संपूर्ण कार्यकाळ भ्रष्टाचारने बरबटलेले होता, असा आरोप करीत टेंडर, अप्रुव्हल, अधिकाऱ्यांच्या नेमणुका, कंत्राटदरकांची देयके, कोटेशन, बेकायदेशीर निर्णय, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याची ऐसीतैशी करणे, मर्जीतलेल्या लोकांना खैराती वाटणे असे प्रकार डॉ. चांदेकर यांनी कुलगुरू पदावर असताना केले आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
'विद्यापीठात शिंपडणार गोमूत्र'
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्रोपचारासह होम पेटविण्यात आला असता आता पुढचे चार-पाच दिवस विद्यापीठात ज्या विभागात डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा स्पर्श झाला त्या विभागात गोमूत्र शिंपडण्यात येणार असल्याचे प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले. शिवाय कुलगुरुच्या दालनातही गोमूत्र शिंपडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात विविध विद्यार्थांचाही सहभाग पहायला मिळाला.
हेही वाचा -खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल