ETV Bharat / state

Amravati Transport Services : मेळघाटात पर्यटकांना नव्या वर्षात सुयोग्य वाहन सेवा, वाचा खास रिपोर्ट - नवीन वर्षात मेळघाटात

नवीन वर्षात मेळघाटात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद हा सुयोग्य वाहन सेवेद्वारे मिळणार आहे. पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या खराब वाहनांसंदर्भात अनेक तक्रारी समोर आल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे यापैकी अनेक वाहनांची तपासणी पूर्ण झाली असून काही वाहनांची तपासणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. (Amravati Transport Services) यामुळे आता मेळघाटातील जंगलात फिरायला पर्यटकांना चांगली वाहने उपलब्ध होणार आहेत.

Amravati Transport Services
वाहन सेवा सुरळीत
author img

By

Published : Jan 1, 2023, 5:32 PM IST

अमरावती : देशातील नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या मेळघाटात पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळ आहेत . मेघाटातील जंगलात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही विशेष अशा सुविधा नसल्यामुळे मेघाटात वन्यजीव विभागाने आकारलेले शुल्क भरून सुद्धा पर्यटकांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने मेळघाटात पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने ही अतिशय निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अशा वाहनातून जंगल सफारी करणे धोकादायक झाले आहे. (Transport Services In Amravati Distict ) मेघाटातील पर्यटन स्थळांवर फिरण्यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने खाजगी व्यक्तींकडून खुल्या जिप्सीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अतिशय निकृष्ट दर्जाच्या असणाऱ्या ह्या जिप्सी चिखलदऱ्यातील पर्यटन स्थळांसह जंगल सफारी तसेच सेमाडोह कोलकास येथील जंगल सफारी सह नरनाळा किल्ला आणि नरनाळा परिसरातील अभयारण्य पर्यटकांना फिरण्यासाठी वापरल्या जातात.

वाहन सेवा सुरळीत

सर्वच गाड्यांची होते तपासणी : दिवसाला दोन-तीन पर्यटकांना या जिप्सी मधातच बंद पडल्यामुळे होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो यापैकी अनेक गाड्यांचे आयुष्य संपल्यात जमा असताना देखील जंगलातील खडतर वाटेवर त्या पर्यटकांना घेऊन धावतात त्यांचे कधी टायर फुटते तर कधी त्या मधातच बंद पडतात. कधी तर चक्क जिप्सी खड्ड्यात जाऊन पडतात अशी परिस्थिती असताना यावर वन्यजीव विभागाच्या वतीने कुठलेही नियंत्रण नसल्याच्या तक्रारी मध्यंतरी वाढल्या होत्या. या संदर्भात जिल्ह्यातील जैवविविधता समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत वऱ्हेकर यांनी नोव्हेंबर महिन्यात तक्रार केली होती. ( tourists in Melghat ) या तक्रारीची दखल घेत आता मेळघाटात पर्यटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच गाड्यांची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे केली जात आहे.

जिप्सी चालकांना सहा जानेवारीपर्यंत मुदत : चिखलदरा परिक्षेत्रातील वैराट जंगलात सफारी करिता एकूण 45 जिप्सीग ची तपासणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. यापैकी 11 जिप्सी वाहनांचे दस्ताऐवज व वाहनेत्रांतिकदृष्ट्या योग्य नसल्यामुळे त्यांना बंद करण्यात आले आहे. 23 वाहनांची अवस्था योग्य असून इतर 23 वाहनांची अद्याप तपासणी व्हायची आहे. या सर्व 23 जिप्सी वाहनधारकांनी सहा जानेवारी पर्यंत आपली वाहने परिवहन विभागाकडून तपासून घेणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांना मेळघाटात जंगल सफारी साठी बंदी घालण्यात येणार असल्याचे चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. एम, एस भैलुमे यांनी स्पष्ट केले आहे.

योग्य पर्यटनाच्या दृष्टीने सुयोग्य निर्णय : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भामध्ये पर्यटकांसाठी असणाऱ्या जिप्सी सफारीची एका नागरिकांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने संबंधित प्रकरणांमध्ये वनविभागाने आणि प्रादेशिक परिवहन विभागाने उत्कृष्ट त्याठिकाणी काम केलं आणि जे काही बेकायदेशीर सफारीचे गाड्या होत्या त्या तपासणी अंती जे काही निष्पन्न झाले ते योग्य झालं असे वन्यजीव मंडळ सदस्य यादव तरटे 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले. स्थानिक जे काही आमचे वन मार्गदर्शक आहेत त्यावर जिप्सीचे जे काही चालक आहेत, पर्यटक आहे या सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आणि याकडे स्थानिक जिप्सी चालकांनी सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे. कायदा व नियमांचे पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. कायदा व नियम सगळ्यांना सारखे आहेत. मेळघाटाच्या उत्कृष्ट पर्यटनाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे एक चांगलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आणि प्रादेशिक परिवहन विभागाने हे पाऊल उचललं आहे असं मला वाटतं असे देखील यादव तरटे म्हणाले.

पर्यटकांच्या सुविधेसाठी दिली होती तक्रार : मागे पर्यटनासाठी मी चिखलदराला गेलो असताना माझ्या जिप्सीला अपघात झाला होता. आता वन विभागाच्या वतीने खराब जिप्सीन विरोधात सकारात्मक पाऊल उचलून अयोग्य गाड्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला ही खरोखरच योग्य बाब आहे. माझे मेळघाटवर प्रचंड प्रेम आहे आणि मेळघाटात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना योग्य सुविधा मिळाव्या हाच माझ्या तक्रारी मागचा उद्देश होता असे श्रीकांत वऱ्हेकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल : मेळघाटातील चिखलदरा हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून नववर्षोत्सवानिमित्त चिखलदऱ्याला पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि एक जानेवारी दरम्यान परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने तेथे वाहनाची गर्दी होऊन वाहतूक कोळंबड्याची व अपघात होण्याची शक्यता राहते.यामुळे मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये दोन दिवस वाहतुकीचे नियम योग्य प्रकारे करता यावे यासाठी 31 डिसेंबरला सकाळी आठ पासून एक जानेवारीला सायंकाळी सहा वाजेपर्यंत परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा रस्ता चिखलदराला जाण्यासाठी तसेच चिखलदऱ्यावरून परतवाडा येण्यासाठी घटांग मार्गे एक मार्गी रस्ता राहणार आहे. पर्यटकांना चिखलदराला जाण्यासाठी तसेच चिखलदऱ्याहून परत येण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.