ETV Bharat / state

पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांच्यासह ४ पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्यासह राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि पुरुषोत्तरम बारड यांना धाडसी कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

President Award to sp Hari Balaji
पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन
author img

By

Published : Jan 25, 2021, 8:53 PM IST

अमरावती - प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्यासह राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि पुरुषोत्तरम बारड यांना धाडसी कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते चौघांनाही सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा - संयुक्त आराखड्यातून संत गाडगेबाबांच्या जन्मभूमीचा विकास - यशोमती ठाकूर

डॉ. हरी बालाजी एन यांनी गडचिरोलीत केले शौर्य काम

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना डॉ. हरी बालाजी एन यांनी नक्षलवाद्यांविरोधात 60 पोलिसांची विशेष तुकडी गठीत केली होती. या तुकडीचा प्रमुख म्हणून त्यांनी 19 नोव्हेंबर 2018 रोजी कुख्यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या धाडसी कामासाठी डॉ. हरी बालाजी एन यांना राष्ट्रपती पुरस्कर प्राप्त झाला.

तिघांना विशेष कार्यासाठी बहुमान

राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस आयुक्तालयातील रीडर शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि विशेष शाखेचे पुरुषोत्तम बारड यांना विशेष कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन, पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि पुरुषोत्तम बारड यांना जून महिन्यात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

हेही वाचा - मेळघाटातील 24 गावांचा अंधार दूर करण्यासाठी केंद्र सरकारशी लढा देणार - बच्चू कडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.