ETV Bharat / state

चालत्या बसमध्येच महिलेला कन्यारत्न; अन् लालपरी थेट पोहचली रुग्णालयात - नांदगांव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात बातमी

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील गर्भवती महिला वृक्षाली अमोल मोहकार यांची एसटी बसमध्येच प्रसुती झाली. त्यांना नांदगाव खंडेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

pregnant-woman-was-delivered-in-st-bus-in-amravati
चालत्या बस मध्येच महीलेला कन्यारत्न
author img

By

Published : Nov 29, 2019, 12:20 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील यावली शहीद गावातील महिला प्रसुतीसाठी आपल्या पतिसह यवतमाळ जिल्ह्यातील दही सावळी या गावी एसटी बसने जात होती. मात्र, एसटी बसमध्येच आठ महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यानंतर चालक आणि वाहक यांनी एसटी बस थेट अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयात नेली. मात्र, बसमध्येच या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बस चालक आणि वाहकाच्या समय सुचकतेने आई व तिच्या बाळाचे प्राण वाचल्याने चालक-वाहकाचे कौतुक केले जात आहे.

चालत्या बस मध्येच महीलेला कन्यारत्न

हेही वाचा- कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडून खेल रत्न पुरस्कार प्रदान

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील गर्भवती महिला वृक्षाली अमोल मोहकार व तिचा पती अमोल मोहकार हे यवतमाळ जिल्ह्यातील माहुरजवळ असलेल्या दही सावळी या गावी जाण्यासाठी गाडीत चढले. एसटी बस अमरावती येथून मार्गस्थ होत नांदगाव खंडेश्वरकडेही निघाली. त्यानंतर ही गाडी माहुली चोर गावाजवळ आली असता वृषाली यांना प्रसुती कळा सुरू झाल्या. याबाबतची माहिती सोबत असलेल्या पतीने बस वाहक ऐ. के. जाधव यांना सांगितली. त्यांनी याबाबत तत्काळ चालक व्हि.ऐ. इंगळे यांना कल्पना दिली. त्यांनी प्रवाशांच्या मदतीने जवळ असलेले नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.प्रविणा देशमुख यांच्याशी संपर्क केला.

बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशांनी गरोदर वृक्षाली यांना मदत केली. परंतु, बस ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ येताच वृक्षालीची प्रसुती बसमध्येच झाली. बस चालक व्हि.ऐ. इंगळे व वाहक ऐ. के. जाधव यांच्या प्रसंगावधाने नांदगाव खंडेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात बस तत्काळ नेण्यात आली. ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांचे पथक सज्ज होते. त्यांनी लगेच महिला व बाळाची बसमध्येच तपासणी केली. त्यानंतर नांदगाव व बस मधील नागरिकांच्या साहाय्याने ट्रेचरने महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले.

बाळाची व महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे अधिक्षिका डॉ. प्रविणा देशमुख यांनी सांगितले. एसटी बसने प्रवास करत असताना अनेकदा कटू अनुभव येत असतो. परंतु, आजच्या चालक व वाहकाच्या समय सुचकतेमुळे एका महिला व तिच्या बाळाला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे या चालक व वाहकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महामंडळाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. सोबतच या घटनेमध्ये अमरावती ते यवतमाळ या मार्गात मोठ-मोठे खड्डे असल्यामुळे या महिलेची प्रसुती वेळी आधीच झाली. या प्रकरणाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी उपस्थित प्रवाशांनी केली आहे.

Intro:चालत्या बस मध्येच महीलेला कन्यारत्न
अन् लालपरी थेट पोहचली रुग्णालयात
--------------------------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद गावातील महिला प्रसूती साठी आपल्या पतिसह यवतमाळ जिल्ह्यातील दही सावळी या गावी एस टी बस ने माहेरी जात असताना .मधातच एस टी बस मध्ये या आठ महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या.परन्तु चालक आणि वाहक यांच्या समयसूचकते मूळे एस टी बस ही थेट अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर मधील ग्रामीण रुग्णालया जवळ पोहचताच बसमध्येच या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एस बस मधील चालक आणि वाहकाच्या समय सुचकतेने आई व तिच्या बाळाचे प्राण वाचल्याने चालक वाहकाचे कौतुक केले जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील गर्भवती महिला वृक्षाली अमोल मोहकार व तिचा पती अमोल मोहकार हे यवतमाळ जिल्ह्यातील माहूर जवळ असलेल्या दही सावळी या गावी जाण्यासाठी गाडीत चढले. एसटी बस अमरावती येथून मार्गस्थ होत नांदगाव खंडेश्वरकडेही निघाली. त्यानंतर सदर गाडी माहुली चोर गावा जवळ आली असता वृषाली यांना प्रसूती कळा सुरू झाल्या याबाबतची माहिती सोबत असलेल्या पतीने बस वाहक ऐ. के.जाधव यांना सांगितली. त्यांनी याबाबत तत्काळ चालक व्हि.ऐ. इंगळे यांना कल्पना दिली. त्यांनी प्रवाशांच्या मदतीने जवळ असलेले नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामिण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.प्रविणा देशमुख यांच्याशी संपर्क केला. बस मध्ये असलेल्या महिला प्रवाशांनी गरोदर वृक्षाली यांना मदत केली. परंतु, बस ग्रामिण रुग्णालयाच्या जवळ येताच वृक्षालीची प्रसुती बस मध्येच झाली. बस चालक व्हि.ऐ. इंगळे व वाहक ऐ. के.जाधव यांच्या प्रसंगावधाने नांदगाव खंडेश्वरच्या ग्रामिण रुग्णालयात बस तात्काळ नेण्यात आली. ग्रामिण रुग्णालयमध्ये डॉक्टराची टीम सज्ज होती. त्यांनी लगेच महिला व बाळाची बस मध्येच तपासणी केली. त्यानंतर नांदगाव व बस मधील नागरिकांच्या सहाय्याने ट्रेचरच्या सहाय्याने गरोदर महिलेला ग्रामिण रुग्णालय मध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी महिला व बाळाला भर्ती करण्यात आले असून बाळाची व महिलेची प्रकृति उत्तम असल्याचे अधिक्षिका डॉ. प्रविणा देशमुख यांनी सांगितले. एसटी बसने प्रवास करत असताना अनेकदा कटू अनुभव येत असतो. परंतु, आजच्या चालक व वाहकाच्या समय सुचकतेमुळे एका महिला व तिच्या बाळाची वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे सदर चालक व वाहकावर कौतुकाचा वर्षाव होत असून, महामंडळाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. सोबतच या घटनेमध्ये अमरावती ते यवतमाळ या मार्गात मोठ मोठे खड्डे असल्यामुळे सदर महीलेची प्रसुती वेळी आधीच झाली असल्याच्या प्रतिक्रीया सर्वत्र उमटत आहे, तरी या प्रकरणाची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी उपस्थित प्रवाशांनी केली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.