अमरावती : तासाभरात पाण्यात 25 योगासने करण्याचे उद्दिष्ट असताना अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत प्रवीण दादाराव आखरे यांनी 22 मिनिटे 52 सेकंदात पाण्यात 50 योगासने पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एका तासात सर्वाधिक 50 योगासनांची नोंद आज अमरावती येथे करण्यात आली आहे.
एका तासात पाण्यावर 50 योगासन करण्याचे टारगेट : अमरावती शहरातील तक्षशिला महाविद्यालय येथील जलतरण केंद्रात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी यांनी 22 मिनिटे 52 सेकंदात पाण्यात 50 योगासने पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी अवघ्या बारा मिनिट 47 सेकंदात इंडियाबुल्क ऑफ रेकॉर्डिंग नाव नोंदवले आहे. यानंतर पुढे 21 मिनिट 52 सेकंदात त्यांनी 50 योगासन करून विक्रम नोंदवला. आता यापुढे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एका तासात पाण्यावर 50 योगासन करण्याचे टारगेट ठेवण्यात येईल, असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर मनोज तत्ववादी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पोलीस आयुक्तांनी केला सत्कार : अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत प्रवीण ठाकरे यांनी पाण्यावर तासाभरात 50 योगासन करण्याचा नवा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविला असताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि सागर पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
काय आहेत योगाचे फायदे?
- योगासने केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- योगामुळे तणाव कमी होतो, वर्तमानात जगायला शिकवतो.
- योगासनांमुळे तुमचे स्नायू मजबूत होतात.
- नियमित योगा केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते.
- योगामुळे तणाव दूर होतो. चांगली आणि शांत झोप लागते.
- योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. पोटाचे विकार दूर होतात.
वृद्धांसाठी योगा फायदेशीर : वय वाढल्यानंतर आपले शरीर कमजोर होऊ लागते. शरीर कमी लवचिक होते, ते निष्क्रिय होते. अशा परिस्थितीत स्वतःला निरोगी आणि लवचिक ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यात नियमित व्यायाम, चांगला आणि सकस आहार यांचा समावेश आहे. परंतु यात योग सर्वात प्रभावी आहे. नियमित योगासने केल्याने ५० वर्षांवरील लोकांचे शरीर सक्रिय राहते. त्याच्या शरीराची गमावलेली लवचिकता परत येण्यास मदत होते. अशा स्थितीत रोज योगासने करणे आवश्यक आहे. योग हे प्रत्येक आजारावर औषध आहे. शरीर लवचिक बनवण्यासाठी रोज चार योगासने करावीत. 50 वर्षांवरील लोक, वृद्धांसाठी योग फायदेशीर आहे. हे शरीरातील समस्या दूर करण्यासोबतच वृद्धांना सक्रिय, निरोगी ठेवण्यास मदत करते.