ETV Bharat / state

Legislative Council Elections : विधानपरिषद निवडणूक ; शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी प्रहार पहिल्यांदाच रिंगणात - प्रहार पहिल्यांदाच रिंगणात

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने पदवीधर व शिक्षक मतदार संघात (election of teachers and graduates ) उडी घेतली आहे. आगामी 30 जानेवारीला होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागेच्या निवडणूकीसाठी ( Legislative Council election) प्रहार जनशक्ती पक्ष मैदानात उतरला आहे. या निवडणुकीसाठी प्रहार पक्षाने आपले ५ उमेदवार जाहीर केले आहे.

Bacchu Kadu
बच्चू कडू
author img

By

Published : Jan 4, 2023, 8:33 PM IST

अमरावती : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Graduate and Teacher Constituency Election) जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, cयांच्या प्रहार पक्षाने पदवीधर व शिक्षक मतदार संघात उडी घेतली आहे. आगामी 30 जानेवारीला होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागेच्या निवडणूकीसाठी (Legislative Council election) प्रहार जनशक्ती पक्ष मैदानात उतरला आहे.

प्रहारचे पाच उमेदवार रिंगणात : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी ती येत्या 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यासाठी विविध पक्ष तसेच संघटनांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यात प्रहार शिक्षक संघटना व मेस्टाचे पाच उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी किरण चौधरी, मराठवाडा औरंगाबाद शिक्षक मतदार संघ डॉ. संजय तायडे, कोकण विभाग नरेश कोंडा आणि नाशिक विभागासाठी एडवोकेट प्रा. सुभाष जंगले अशी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रहारचे दोन तर मेस्टाचे तीन उमेदवार आहेत.

प्रहारला या पक्षाचा पाठिंबा : स्वाभिमानी शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद , महात्मा फुले शिक्षक परिषद , शिक्षक भारती शाळा कृती समिती मराठा क्रांती मोर्चा शिक्षक समन्वय संघ मराठवाडा मुख्याध्यापक संघ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ आदींनी प्रहार मेस्टाला पाठिंबा दर्शवलेला आहे.

निवडणूकीकडे लक्ष : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे रणजीत पाटील, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदार संघात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.