ETV Bharat / state

संचारबंदीमध्ये विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा; दंत महाविद्यालय प्रशासनाचा अजब निर्णय

author img

By

Published : Apr 20, 2021, 6:47 PM IST

Updated : Apr 20, 2021, 7:30 PM IST

कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्र दहशतीच्या सावटाखाली असताना राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. विद्यापीठांनी आपल्या परीक्षा कोरोनाच्या स्थितीत पुढे ढकलल्या तर काही परिक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये आणि विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी शासन, प्रशासन खबरदारी घेत असताना अमरावती शहरातील दंत महाविद्यलयाने विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन प्रत्यक्षिक परीक्षा घेतल्या असून यामुळे सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडवीत विद्यार्थी एकत्र आले आहेत.

महाविद्यालय
महाविद्यालय

अमरावती - कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्र दहशतीच्या सावटाखाली असताना राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. विद्यापीठांनी आपल्या परीक्षा कोरोनाच्या स्थितीत पुढे ढकलल्या तर काही परिक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये आणि विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी शासन, प्रशासन खबरदारी घेत असताना अमरावती शहरातील दंत महाविद्यलयाने विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन प्रत्यक्षिक परीक्षा घेतल्या असून यामुळे सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडवीत विद्यार्थी एकत्र आले आहेत. हा प्रकार गंभीर असून विद्यार्थी आणि पालक महाविद्यलयाच्या निर्णयामुळे भयभीत झाले असून कोणी तरी आमच्या अधिष्ठात्याना समजावा अशी मागणी त्यांच्या कडून होत आहे.

संचारबंदीमध्ये विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा; दंत महाविद्यालय प्रशासनाचा अजब निर्णय

प्रयोगशाळेत शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी

आज (दि. 20 एप्रिल) प्रॅक्टिल एक्झाम आल्याने 35 ते 40 विद्यार्थी प्रयोगशाळेत एकत्र आलेत. यावेळी प्रयोगशाळेत चांगलीच गर्दी झाली. सोशल डिस्टनसिंग ठेवा, असे म्हणत विद्यार्थी हास्य विनोदही करत होते. आम्हाला ऑफलाइन परीक्षेला बोलावले हे आम्हला पटलेले नाही. पण, करणारे काय अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत होते. मात्र, प्राध्यापकांच्या धाकाने कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे धाडस विद्यार्थ्यांना केले नाही.

अधिष्ठाता म्हणाले कुठलीही भीती नाही

यावर्षी बिडीएसचे 100 विद्यार्थी आहेत तर एमडीएसचे 10 विद्यार्थी आणि पीएचडीचे 12 विद्यार्थी आहेत. एक भावी डॉक्टर म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना कोरोना किंवा कुठल्याही महामारीच्या परिस्थितीत कशी काळजी घ्यायची याचे प्रशिक्षण दिले जाते. असे महाविदयलायचे अधिष्ठाता डॉ. राजेश गोंधळेकर यांनी स्पष्ट केले. आता प्रात्यक्षिक परीक्षांसाठी काही गडबड झाली असेल तर आम्ही काळजी घेऊ. बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची आम्ही काळजी घेत आहोत. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाने सूट दिली आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी आता काही दिवसात कोविड रुग्णालयात सेवा देण्यास सज्ज होतील, असेही डॉ. राजेश गोंधळेकर म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सिमेवर कडक बंदोबस्त; निगेटीव्ह अहवालानंतरच महाराष्ट्रात प्रवेश.

हेही वाचा - मंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटाचा केला दौरा: एका तरुणीकडून विकत घेतला भाजीपाला

Last Updated : Apr 20, 2021, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.