ETV Bharat / state

परतवाडा- चिखलदरा मार्गाची दुरवस्था, खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले - अमरावती जिल्हा लेटेस्ट न्यूज

विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीमधील चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटनासाठी हजारो पर्यटक राज्यभरातून येत असतात. परंतु चिखलदऱ्याला जाण्यासाठी असलेला मुख्य मार्ग परतवाडा- चिखलदरा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Poor condition of Paratwada-Chikhaldara road
परतवाडा- चिखलदरा मार्गाची दुरवस्था
author img

By

Published : Dec 19, 2020, 5:37 PM IST

अमरावती - विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीमधील चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटनासाठी हजारो पर्यटक राज्यभरातून येत असतात. परंतु चिखलदऱ्याला जाण्यासाठी असलेला मुख्य मार्ग परतवाडा- चिखलदरा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात. सर्वाधिक पर्यटक हे परतवाडा या मार्गाने चिखलदरा येथे येत असतात. परंतु या मार्गाची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांकडून दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल गोळा केला जातो. मात्र त्याच पर्यटकांना या रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

परतवाडा- चिखलदरा मार्गाची दुरवस्था

आधीच रस्ता अरुंद त्यात खड्डेच खड्डे

परतवाडा चिखलदरा हा तीस किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या वाहनांची ये-जा सुरू असते, परंतु हा रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात वाहतूक कोंडी

पावसाळ्यामध्ये पर्यटकांचा सर्वाधिक ओढा हा चिखलदऱ्याकडे असतो. पावसाळ्यात याठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक इथे येतात. मात्र रस्ता खराब असल्यामुळे या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.