अमरावती: देशाच्या 77राव्या स्वतंत्र्य दिनानिमित्त छगन भुजबळ हे अमरावतीच्या जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजारोहण करणार आहेत. आज सायंकाळी त्यांचे अमरावतीत आगमन झाले असता सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यानंतर मुक्कामासाठी ते विश्राम भवन येथे पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नवाब मलिकांना आरामाची गरज: सध्या नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात राहणार याबाबत माध्यम प्रतिनिधी सातत्याने प्रश्न उपस्थित करीत आहेत. वास्तवात नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना उपचाराची गरज आहे. यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या त्यांना आरामाची गरज असून त्यानंतर त्यांना कुठे जायचे हे ते ठरवतील; मात्र ते आमच्यापासून कुठे दूर राहणार नाहीत, असे छगन भुजबळ म्हणाले.
काका-पुतळ्यांची भेट, यात गैर काय? शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीला सध्या प्रसार माध्यमांनी बरीच प्रसिद्धी दिली. खरंतर राजकारणा पलीकडे देखील राजकारणाचे आयुष्य, नातेसंबंध, कुटुंब आहे. काका आणि पुतळ्यांची भेट होणे यांच्यात गैर काहीही नाही. ते भेटले यात काही चूक झाली, असे म्हणता येण्यासारखे नाही; मात्र प्रसारमाध्यमे सातत्याने त्यांच्या भेटीबाबत रंगवून सांगत आहेत. त्यात काही अर्थ नसल्याचे देखील छगन भुजबळ म्हणाले. राज ठाकरे यांना भाजपच्या वतीने सत्तेत सामील होण्याची ऑफर दिली असेल. या संदर्भात राज ठाकरे काय तो निर्णय घेतील. त्यांच्या बाबतच्या प्रश्नाचा आमच्याशी काही संबंध नाही, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.
संभाजी भिडेंचा समाचार: छगन भुजबळ यांनी यापूर्वी संभाजी भिडे यांचाही समाचार घेतला आहे. संभाजी भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत असल्याने राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी करण्यात येत आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी भिडेंवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. भुजबळ फार्म कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
हेही वाचा: