अमरावती - नागपूर येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एका पोलीस व्हॅनने इर्टिगा कारला धडक दिली. या घटनेत कारमधील रुग्ण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास मोझरीजवळ घडली. सदर कारमध्ये नागपूर येथून रुग्णास अमरावतीकडे नेले जात होते.
हेही वाचा - ६०० लोकवस्ती असलेल्या गावाने राबवला प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी प्रयोग
आयुक्तालय येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद तायडे हे नागपूर येथे MH.27 A. 9504 या पोलीस व्हॅनने बॅरिकेट घेऊन गेले होते. तेथून ते परत येत असताना रात्री 11 वाजताच्या सुमारास गुरुकुंज मोझरी बसस्थानक जवळील स्पीडब्रेकरवर समोरील आर्टिका कार क्र. MH-27 BZ. 0652 ला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचालकाला दुखापत झाली आहे. तसेच कारचे सुद्धा 1 लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार अभिजित ओंकार नेवरकर (वय 24,दर्यापूर) यांनी तिवसा पोलिसात दाखल केली. या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी आरोपी मिलिंद तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे.