ETV Bharat / state

विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेला पोलीस पाटलाने केली शरीरसुखाची मागणी - crime news

अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथे संस्थात्मक विलगीकरणा केंद्रामधील एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

amravati
पोलिसांकडे व्यथा मांडताना पीडिता
author img

By

Published : May 10, 2020, 1:33 PM IST

अमरावती - महसूल उत्पादन वाढवण्याच्या हेतूने शासनाने सुरू केलेल्या दारू विक्रीचे परिणाम अमरावती जिल्ह्यात दिसून आले. चक्क पोलीस पाटलानेच दारूच्या नशेत विलगीकरण कक्षात असलेल्या एका मजूर महिलेला शरीरसुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथे घडला आहे. तर दुसरीकडे पोलीस पाटलाच्या अशा वागणुकीमुळे विलगीकरण कक्षात असलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव राजदी येथील एक महिला आपल्या पतीसोबत मुंबई येथे मोलमजुरीला गेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर त्या दोघांनी सुद्धा आपले मूळ गाव वडगाव राजदी गाठले. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ती गावकऱ्यांच्या विनंतीनुसार ती आपल्या पतीसोबत जिल्हापरिषद शाळेच्या विलगीकरण कक्षात बुधवारपासून (दि. 6 मे) रहात आहे. वडगाव बाजदी येथील पोलीस पाटील रणजित गजबे यांच्याकडे वडगाव राजदी या गावचा कार्यभार असल्याने त्यांनी विलगीकरणाची व्यवस्था केली. मात्र, शुक्रवारी (दि. 9 मे) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस पाटील रणजित गजबे हा संबंधित महिलेजवळ आला व अश्लील भाषेत बोलत शरीर सुखाची मागणी केली व मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी दिली.

इतर उपस्थितांच्या समोर ही घटना घडली. महिलेने आरडाओरडा करताच पोलीस पाटील घटनास्थळावरून पळून गेला. आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी व आशा सेविका आल्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. गावकऱ्यांनी लगेच चांदूर पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक शंकर ढोले व पोलीस शिपाई पंकज शेंडे, विनोद वासेकर यांनी आरोपी पोलीस पाटलाला ताब्यात घेतले. पोलीस पाटीलच्या विरोधात भा.दं.वी. 354 (अ), 394 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - मेळघाट व्याघ्रप्रकल्पात पार पडली प्राणी गणना; ५४६ मचाणांवरून १७५४२ प्राण्यांचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.