ETV Bharat / state

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका 'लीक' करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा - अमरावती पोलीस

अभियांत्रिकी शाखेचा मॅकेनिक्स विषयाचा २७ मे रोजी सकाळी नऊ वाजता होता. मात्र  त्याचदिवशी सकाळी सुमारे सव्वा आठ वाजता  विद्यार्थ्यांमध्ये व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका पसरली होती.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
author img

By

Published : Jun 9, 2019, 5:27 PM IST

Updated : Jun 9, 2019, 6:54 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील अभियांत्रिकी शाखेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार २७ मे रोजी समोर आला होता. प्रश्नपत्रिका फोडून विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणाऱ्या दोघांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आशिष राऊत (रा. बोर्डी तालुका अकोट. जिल्हा अकोला) आणि ज्ञानेश्वर बोरे( रा. उकडी तालुका मेहकर, जिल्हा बुलडाणा) अशी दोन आरोपींची नावे आहेत.

अभियांत्रिकी शाखेचा मॅकेनिक्स विषयाचा २७ मे रोजी सकाळी नऊ वाजता होता. मात्र त्याचदिवशी सकाळी सुमारे सव्वा आठ वाजता विद्यार्थ्यांमध्ये व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका पसरली होती. ही प्रश्नपत्रिका वाशिम येथील संमती महाविद्यालाच्या परीक्षा केंद्रावरून डाऊनलोड झाल्याचे स्पष्ट झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणाची तक्रार पोलिसात द्यावी, अशी मागणी केली होती. अधिसभेनेही हे प्रकरण पोलिसात द्यावे, अशी चार जूनला मागणीही केली होती. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीचे काम पूर्ण होताच आठ दिवसात पोलिसात तक्रार देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांकडे दिली.

गुन्ह्याची माहिती देताना पोलीस

अशी राबविली जाते परीक्षा यंत्रणा-
विद्यापीठ प्रशासन विभागातील सर्व संबंधित परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठवते. त्या परीक्षाकेंद्राचे प्रमुख हे महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. परीक्षेच्या 10 मिनिटांपूर्वी प्राचार्यांच्या ईमेलवर आलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड केली जाते. त्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून परीक्षार्थींना वितरित केल्या जातात.

पोलीस उपनिरीक्षक लेवाटकर हे चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोरमले यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

Intro:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा शिरू होण्याच्या पाऊण तास आधी ती मेलवरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप्प वर पाठविणाऱ्या दोघांविरुद्ध येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

Body:आशिष राऊत (रा. बोर्डी तालुका अकोट. जिल्हा अकोला) आणि ज्ञानेश्वर बोरे( रा. उकडी तालुका मेहकर, जिल्हा बुलडाणा) अशी दोन आरोपींची नावे आहेत. संत गाडगेबाबा अमरावती बिद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला शनिवारी सायंकाळी तक्रार दिली.
विद्यापीठाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाऊण तास आधीच व्हाट्सअप्प वर वायरल होणे हा धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यापीठ प्रशासन विभागातील सर्व संबंधित परीक्षा केंद्रावर प्रशपत्रिका पाठवते. त्या त्या परिक्षाकेंद्राचे प्रमुख असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य परीक्षेच्या 10 मिनिटं आधी त्यांच्या मेल वर आलेली प्रशपत्रिका डाऊनलोड करून त्याच्या झेरॉक्स काडून परीक्षार्थींना वितरित केल्या जातात. असे असताना 27 मे रोजी सकाळी 9 वाजता असलेल्याअभियांत्रिकी शाखेचा मॅकेनिक्स विषयाची प्रशपत्रिका 8.15 ला व्हाट्सअप्प वरून वायरल झाली. ही प्रशपत्रिका वाशिम येथील संमती महाविद्याल या परीक्षा केंद्रावरून डाऊनलोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. होते. अखिल भारतीय बिद्यार्थी परिषदेने या प्रकरणाची तक्रार पोलिसात द्यावी अशी मागणी केली होती. 4 जूनला अधिसभेनेही हे प्रकरण पोलिसात द्याबे अशी मागणी केली असता कुलगुरू डॉ. मुरलीधार चांनदेकर यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीचे काम पूर्ण होताच 8 दिवसात या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. शनिवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांकडे दिली.
पोलिसांनी आशिष राऊत आणि ज्ञानेश्वर बोरे यांचया विरोधात गुन्हा दाखल केला असुन पोलीस उपनिरीक्षक लेवाटकर हे या प्रकणाची चौकाशी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोरमले यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

Conclusion:
Last Updated : Jun 9, 2019, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.