ETV Bharat / state

दमदाटी करून पैसे उकळणाऱ्या वाहतूक पोलिसाची होणार चौकशी - वाहतूक पोलीस

वाहतूक पोलिसांने कारवाईचा धाक दाखवत तरुणांकडून पैसे उकळले. मात्र त्याची कोणतीही पावती दिली नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पैसे उकळणारा पोलीस चैकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.

पैसे घेताना पोलीस
author img

By

Published : Jun 20, 2019, 2:31 PM IST

अमरावती - शहरात वाहन तपासणीच्या नावाखाली रक्तदान करायला जाणाऱ्या तरुणांकडून वाहतूक पोलिसाने पाचशे उकळले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर पैसे घेणाऱ्या त्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश अमरावती शहराचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी दिले. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी याप्रकरणी सहाय्यक आयुक्त बळीराम डाखोरे यांच्याकडे चौकशी सोपवली आहे.

पैसे घेताना पोलीस

दंडाच्या नावाखाली वाहतूक पोलीस दुचाकी चालकाकडून पाचशे रुपये घेत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. माध्यमांमध्ये हा विषय गाजल्यानंतर ट्रायबल फोर्सकडून पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. काही तरुण 13 जूनला गरजूंना रक्तदानासाठी दुचाकीने अमरावतीच्या पंचवटी चौकातून जात होते. यावेळी पंचवटी चौकातील सिग्नलवर कर्तव्यावरील वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमेश मारोडकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी या तरुणांची दुचाकी अडवली होती. दुचाकीची चावी काढून चालकाला शिवाजी कॉलेज समोर बोलावण्यात आले होते. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने दुचाकी चालकाशी बोलून सर्वासमक्ष पाचशे रुपये घेतले. पण त्याची पावती दिली नाही.

याचा व्हिडिओ संबंधित तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला. तो समाज माध्यमात व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणात कारवाईची मागणी केली. पोलीस आयुक्तांनीही त्याची गंभीर दखल घेतली असून त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त बळीराम डाखोरे यांच्याकडे सोपवली आहे.

Intro:अमरावतीत दमदाटी करून अवैध रित्या पैसे घेणाऱ्या 'त्या' वाहतूक पोलिसाची होणार चौकशी.

पाचशे रुपये घेतल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल.

---------------------------------------------

   अमरावती अँकर

अमरावती शहरात वाहन तपासणीच्या नावाखाली रक्तदान करायला जाणाऱ्या दोन तरुणांना थांबुन त्यांच्या कडून अवैध रित्या पाचशे रुपये घेऊन व त्याची कुठलीही पावती न दिल्याचा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा तो व्हिडीओ काल समाज माध्यमावर चांगलाच  व्हायरल झाल्यानंतर पैसे घेणाऱ्या त्या वाहतूक

शाखेच्या  पोलीस कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश अमरावती शहराचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी दिले.पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी त्याची चौकशी वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त बळीराम डाखोरे यांच्याकडे सोपवली आहे.

 अमरावती दंडाच्या नावाखाली वाहतूक पोलीस दुचाकी चालकाकडून पाचशे रुपये घेत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो  व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली होती .माध्यमांमध्ये हा विषय गाजल्यानंतर ट्रायबल फोर्स कडून पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली होती .काही तरुण 13 जूनला गरजूंना रक्तदानासाठी दुचाकीने अमरावतीच्या पंचवटी चौकातून जात होते. यावेळी पंचवटी चौकातील सिग्नलवर कर्तव्य वरील वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमेश मारोडकर सह अन्य कर्मचाऱ्यांनी या तरुणांची दुचाकी अडवली होती .दुचाकीची चावी काढून चालकाला शिवाजी कॉलेज समोर बोलावले होते त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने दुचाकी चालकाशी बोलून सर्वक्षम पाचशे रुपये स्वीकारणे पण त्याची पावती दिली नाही.  या संबंधीचा व्हिडिओ संबंधित तरुनाणीं कॅमेरात कैद केला व  तो समाज माध्यमात व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणात कारवाईची मागणी केली. पोलीस आयुक्तांनी ही त्याची गंभीर दखल घेतली असून त्यानंतर पोलिस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी याची चौकशी वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त बळीराम डाखोरे सोपवली आहेतBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.