ETV Bharat / state

'31 डिसेंबरला रात्री 11 नंतर घराबाहेर पडू नका; कारवाई होणार' - अमरावती पोलीस लेटेस्ट न्यूज

नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

अमरावती पोलीस लेटेस्ट न्यूज
अमरावती पोलीस लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Dec 30, 2020, 6:32 PM IST

अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायदा जिल्ह्यात लागू झाला असून शहरात रात्रीची संचारबंदी आहे. यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री 11 नंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अमरावतीकरांनी नवीन वर्ष स्वागताचा जल्लोष रस्त्यावर येऊन करू नये, असा इशारा पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिला आहे.

31 डिसेंबरला रात्री 11 नंतर घराबाहेर पडू नका; कारवाई होणार
शहरातील सर्व उड्डाणपूल राहणार बंद

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई भरधाव वेगात दुचाकी पळवितात. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासह खबरदारी म्हणून गाडगेनगर, राजकमल आणि राजापेठ येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहे.

हेही वाचा - कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम हरवला धुक्यात.. कराडकरांनी लुटला गुलाबी थंडीचा आनंद

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर करडी नजर

नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरात राहणार सर्वत्र पोलीस बंदोबस्त

31 डिसेंबरच्या रात्री शहरातील सर्व महत्वच्या भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. शहरातील राजकमल, राजापेठ, इर्विन या महत्त्वाच्या चौकांत गर्दीवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत. शहरालगत असणारी हॉटेल्सही रात्री 11 नंतर बंद ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 31 डिसेंबरच्या रात्री पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा रस्त्यावर उतरणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिक शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री; मनुष्यांसह पक्षांनाही दुखापत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.