ETV Bharat / state

मेळघाटातील रुईफाटामध्ये कोरोना संभाव्य रुग्ण.. गावाचे निर्जंतुकीकरण - ruifata news

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या रुईफाटा या गावात संशयीत कोरोनाग्रस्त आढळून आला. त्यामुळे प्रशासनाने खबरादी म्हणून या गावात फवारणी करत निर्जंतुकीकरण करण्यात आले.

फवारणी करताना
फवारणी करताना
author img

By

Published : Apr 12, 2020, 12:40 PM IST

Updated : Apr 13, 2020, 12:00 AM IST

अमरावती - जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या रुईफाटा या गावात संशयित कोरोनाग्रस्त आढळून आला. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी आरोग्य विभागाच्यावतीने गावात फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले.

रुईफाटा गावाचे निर्जंतुकीकरण
7 एप्रिलला सायंकाळी रुईफाटा या गावातील एका युवकामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे त्याला आरोग्य विभागाच्या पथकाने अमरावती येथील कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मेळघाटात आढळलेला हा पहिलाच संभाव्य कोरोना रुग्ण आहे. हा युवक काही दिवसांपूर्वी गुजरात राज्यातून घरी आला होता.

रुईफाटा या गावात सध्या काहीसे धास्तीचे वातावरण आहे. रविवारी पहाटेच गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. गावात सर्वत्र निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यावेळी डॉ. गीते, सरपंच प्रकाश जामकर, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

Last Updated : Apr 13, 2020, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.