ETV Bharat / state

आपण कधी सुधरणार? भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

खरेदीसाठी आलेल्या शेकडो ग्राहकांनी मास्कच लावले नसल्याचे समोर आले. भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहेत.

आपण कधी सुधरणार? भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
आपण कधी सुधरणार? भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
author img

By

Published : Apr 5, 2020, 10:51 PM IST

अमरावती - कोरोनाला हरवण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. त्यासाठी वस्तू खरेदी करताना प्रशासनाने आखून दिलेल्या अंतरावरुन भाजीपाला खरेदी करणे गरजेचे असताना अमरावतीमध्ये याचा फज्जा उडालेला दिसत आहे. अमरावती सायन्सकोर मैदानावर आज भरलेल्या भाजी बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन न पाळता भाजीपाला खरेदी केला.

खरेदीसाठी आलेल्या शेकडो ग्राहकांनी मास्कच लावले नसल्याचे समोर आले. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच मात्र अमरावती जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजना व अतिदक्षतेमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता पण दुर्दैवाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच आजारी पडलेल्या एका रुग्णांना काल मृत्यू झाला होता. दरम्यान, काल मध्यरात्री त्याचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने आणि त्याचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले.

आपण कधी सुधरणार? भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

आता अमरावती जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावतीत काल एक कोरोनाचा बळी गेल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे तर हैदरपुरा आणि बडनेऱ्यातील जुनी वस्ती सील केली आहे. मात्र, भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहेत. आता लोक आपली सामाजिक बांधिलकी जपत सोशल डिस्टन्सिंग पाळतील का, हा प्रश्न निर्माण होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.