ETV Bharat / state

निंभोरा परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांनी फोडला रस्ता... - well

शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहालगत निंभोरा परिसरातील झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी तुंबले आहे. या भागातील पाणी बाहेर काढण्यासाठी येथील राहिवाशांनी चक्क रस्ताच फोडला आहे.

पाणी साचल्याचे छायाचित्र
author img

By

Published : Aug 1, 2019, 2:46 PM IST

Updated : Aug 1, 2019, 3:13 PM IST

अमरावती - शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहालगत निंभोरा परिसरातील झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. या भागातील पाणी बाहेर काढण्यासाठी येथील राहिवाशांनी चक्क रस्ताच फोडला आहे. त्याचबरोबर त्यांनी परिसरातील तुडुंब भरलेल्या विहीरी भोवतालचे कुंपणही काढले. त्यामुळे विहीर व त्या भोवतालच्या रिकाम्या जागेवर साचलेले पाणी यात कुठलाही अंदाज लागत नसल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी शशांक लवारे

सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहालगत असणाऱ्या या परिसरात पाच वर्षांपूर्वी विटांच्या भट्ट्यांचे अतिक्रमण होते. त्यानंतर विटभट्ट्या चालवीणाऱ्यांनी ही जागा काही लोकांना विकल्यावर या परिसरात गत तीन ते चार वर्षांपासून झोपडपट्टी वसली आहे. पावसाळ्यात या झोपडपट्टी परिसरात पाणी साचते. मागच्या वर्षी या भागात झोडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यावर महापालिका प्रशासनाने सलग ४८ तासांपर्यंत पंप लावून या भागातील पाणी काढले होते. मात्र, यावर्षी येथील राहिवाशांना महापालिका प्रशासनाकडे पाणी साचण्याबाबत तक्रार केली असता, हा भाग अतिक्रमण केलेला आहे, तुम्ही हा परिसर सोडा आशी महापलिकेकडून सूचना देण्यात आली. महापालिका प्रशासन मदतीला येत नसल्याने येथील राहिवाशांनी पक्का रस्ता फोडून रस्त्याच्या मधातूनच परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली. मात्र ते पाणी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह परिसरात गेले आहे.

या परिसरात मुख्य रस्त्याला लागूनच एक विहीर आहे. पावसामुळे ही विहीर तुडुंब भरली आहे. तसेच विहिरी लगतच्या मोकळ्या जागेवर देखील पाणी साचले आहे. त्यामुळे विहीर नेमकी कोठे आहे, हे समजने कठीण जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने धोका ओळखून या विहिरीच्या भोवताली तारेचे कुंपण घातले होते. मात्र, या भागातील राहिवाशांनी विहिरीचे कुंपण काढून स्वतःच्या घरा भोवताल लावले. एकूण या भागात परिस्थिती गंभीर असून महापालिका प्रशासन या समस्येवर कोणता तोडगा काढणार? रस्ता फोडणाऱ्यांवर काही कारवाई होणार का? विहिरीत अपघात होणार नाही यासाठी आता कशा स्वरूपाची खबरदारी घेतली जाणार, याकडे परिसरातील रहीवाशांचे लक्ष लागले आहे.

Intro:अमरावती शहरात समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहालगत निंभोरा परिसरातील झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी तुंबले आहे. या भागातील पाणी बाहेत काढण्यासाठी येथील राहिवास्यांनी चक्क रस्ता फोडला. परिसरातील विनाकठड्याची विहीर पाण्याने तुडुंब भरली असून विहीर आणि रिकाम्या जागेवर साचलेले पाणी यात कुठलाही अंदाज लागत नसल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

Body:सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहालगत असणाऱ्या या परिसरात पाच वर्षांपूर्वी विटांच्या भट्ट्यांचे अतिक्रमण होते. विटभट्ट्या चालवीणाऱ्यांनी ही जागा काही लोकांना विकल्यावर या परिसरात गत तीन ते चार वर्षांपासून झोपडपट्टी वसली आहे. पावसाळ्यात या झोपडपट्टी परिसरात पाणी साचत. मागच्या वर्षी या भागात झोडपट्ट्यांमध्य पाणी शिरल्यावर महापालिका प्रशासनाने सलग 48 तासांपर्यंत पंप लावून या भागातील पाणी काढले होते. यावर्षी येथील राहिवास्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असताना हा भाग अतिक्रमण केलेला आहे. तुम्ही हा परिसर सोडा आशा सूचना देण्यात आल्या. यावर्षी महापालिका प्रशासन मदतीला येत नसल्याने येथील राहिवास्यांनी पक्का रस्ता फोडून रस्त्याच्या मधतूनच परिसरातील पाणी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह परिसरात सोडले आहे.
या परिसरात मुख्य रस्त्याला लागूनच एक विहीर आहे. पावसामुळे ही विहीर तुडुंब भरली असून विहिरी लगतच्या मोकळ्या जागेवर तुंबलेले पाणी आणि विहीर यात कुठलाही फरक ओळखायला येत नाही. महापालिका प्रशासनाने धोका ओळखून या विहिरीच्या भोवताली तारेचे कुंपण घातले होते. या भागातील राहिवास्यांनी विहिरीचे कुंपण काढून स्वतःच्या घरा भोवताली लावले. एकूण या भागात परिस्थिती गंभीर असून महापालिका प्रशासन या समस्येवर कोणता तोडगा काढणार? रस्ता फोडणाऱ्यांवर काही कारवाई होणार का? विहिरीत अपघात होणार नाही यासाठी आता कशा स्वरूपाची खबरदारी घेयले जाणार याकडे परिसरातील रहीवाशांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 1, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.