ETV Bharat / state

बसस्थानक परिसराची दैना; घाणीच्या साम्राज्यात प्रवासी - अमरावती बसस्थानक परिसर

गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उपाहारगृह, शौचालयातून निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर तुंबले असल्याने याठिकाणी प्रवाशांना घाणीसह दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

people are having problem of uncleanliess in bus stand area
बसस्थानक परिसराची दैना; घाणीच्या साम्राज्यात प्रवासी
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:37 PM IST

अमरावती - गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उपाहारगृह, शौचालयातून निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर तुंबले असल्याने याठिकाणी प्रवाशांना घाणीसह दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

बसस्थानक परिसराची दैना; घाणीच्या साम्राज्यात प्रवासी

हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन

गेल्या सहा महिन्यांपासून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. या परिसरात अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या गाड्या उभ्या राहतात त्या ठिकाणी प्रवाशांना या सांडपाण्यातूनच गाडी पकडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे. उपहारगृहातून बाहेर पडणारे पाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये घाण कचरा साचला असून पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. प्रचंड घाण साचली असून या घाणीतून वाहणारे पाणी थेट बस स्थानक परिसरात येत असल्याने येथील वातावरण अतिशय घाणेरडे झाले आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत आगार व्यवस्थापकांसह महापालिकेकडे तक्रार केली असून या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून लवकरच काम सुरू होईल, अशी माहीती उपहारगृहाचे व्यवस्थापक सुधीर गावंडे यांनी दिली. परिसरातील सांडपाण्याची ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी प्रवाशांनीही केली.

Intro:अमरावती मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सांडपाणी तुंबले आहे. गेल्या अनेक दिवसापासून पाईप लाईन चोकअप असल्यामुळे बसस्थानक परिसरातील उपाहारगृह शौचालय या ठिकाणावरुन निघणारे सांडपाणी थेट बस स्थानक परिसरात तुंबले असल्याने याठिकाणी प्रवाशांना घाणीसह दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे.

Body:अमरावती मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गत सहा महिन्यांपासून सांडपाणी वाहते आहे अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या राहतात त्या ठिकाणी सांडपाणी तुंबली असून प्रवाशांना या सांडपाण्यातूनच गाडी पकडण्यासाठी मार्ग काढावा लागतो आहे. बस स्थानक परिसरात असणाऱ्या उपहारगृहातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते हे पाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये घाण कचरा दगड-गोटे पडले असून हे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे यामुळे गत सहा महिन्यापासून प्रचंड घाण बसस्थानक परिसरात साचली असून ह्या घाणीतून वाहणारे पाणी थेट बस स्थानक परिसरात येत असल्याने येथील वातावरण अतिशय घाणेरडे झाले आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत आगार व्यवस्थापकांसह अमरावती महापालिकेकडे तक्रार केली असतानाही अद्याप या समस्येकडे कोणीही लक्ष दिले नाही. हे काम आज होईल उद्या होईल असेच उत्तर देण्यात येत असून आता लवकरच काम सुरू होईल असे सांगण्यात आले असल्याचे उपहारगृहाचे व्यवस्थापक सुधीर गावंडे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.
बस स्थानकावर सांडपाणी हे गत सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून साचले असून आगार व्यवस्थापक आणि महापालिका प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी ईटीव्ही भारतशी बोलताना निलेश नरोडे या प्रवासाने केली आहे. आता मध्यवर्ती बसस्थानक प्रशासन आणि महानगरपालिका या गंभीर समस्येची दखल कधी घेणार याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.