ETV Bharat / state

कौंडण्यपूर रुक्मिणी मातेच्या पालखीला परवानगी नाही, विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजी

पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूच्या साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरी असे असले तरी आळंदी आणि देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुका दशमीला हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

Pandharpur Wari 2020 : No Ashadhi Palkhi procession this year due to COVID-19
कौंडण्यपूर : रुक्मिणी मातेच्या पालखीला परवानगी नाही, विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजी
author img

By

Published : Jun 9, 2020, 1:27 PM IST

अमरावती - दरवर्षी आषाढी वारीला माता रुक्मिणीचे माहेर तसेच प्राचीन परंपरा व संस्कृती लाभलेले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी पांडूरंगाच्या मंदिरात विणा मंडपामध्ये नेण्यात येते. भगवंतातर्फे माता रुक्मिणाला साडी-चोळीचा आहेर दिला जातो. यानंतर रुक्मिणी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ ठेवल्या जातात आणि भगवंताचा आशीर्वाद घेतला जातो. ही परंपरा मागील ४२५ वर्षांपासून सुरू आहे. पण, यंदाच्या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या पालखीला परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे ४२५ वर्षांच्या परंपरेला खंड पडू नये, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर कमिटी व युवा विश्व वारकरी सेना यांच्यातर्फे प्रशासनला निवेदन देण्यात आले.

पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरी असे असले तरी आळंदी आणि देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुका दशमीला हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

ह.भ.प. गणेश महाराज शेटे बोलताना...

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून मोजक्याच पालखी पंढरपूरला हेलीकॉप्टर, वाहन किंवा अन्य मार्गाने नेण्यात येणार आहेत. मोजक्या पालख्यांमध्ये विदर्भातील एकही पालखीचा समावेश नाही. त्यामुळे विदर्भातील वारकरी मंडळीमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. तसेच कौंडण्यपूर येथील रुक्मिणी माता पालखीच्या ४२५ वर्षांच्या परंपरेला खंड पडू नये, याकरिता श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर कमिटी व युवा विश्व वारकरी सेना यांच्यातर्फे प्रशासनला निवेदन देण्यात आले. यातून पालखीला परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील पुजदा गावात उघडली धान्य बँक.. युवकांनी भागवली गरजुंची भूक
हेही वाचा - मिशन बिगिन अगेन : अमरावतीचे जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.