अमरावती: आंतरराष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्षपद ( post of President of the International Conference) पद्मश्री पुरस्कृत डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे (Padmashri Dr Ravindra and Dr Smita Kolhe) हे दाम्पत्य भुषवणार आहे. या संमेलनात मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक व वैज्ञानिक अशा अनेक विषयांचा समावेश असतो तसेच स्थानिक मराठी तसेच भारतीय कलाकार सहभागी होत असतात. संमेलन समितीमध्ये यशवंत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माणिक देशमुख, मदन देशमुख, अजिंक्य पवार, प्रशांत जाधव, प्रणव जतकर आदी परिश्रम घेत आहेत. डॉक्टर रवींद्र कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात. त्यांना नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २०१८ सालचा गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात आला. रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी स्मिता कोल्हे यांना २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरीत्या देण्यात आलेला आहे.
Honor of the Kolhe couple : पद्मश्री डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे भुषवणार आंतरराष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्षपद - पद्मश्री डॉ रवींद्र व डॉ स्मिता कोल्हे
येत्या २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्षपद ( post of President of the International Conference) पद्मश्री पुरस्कृत डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे (Padmashri Dr Ravindra and Dr Smita Kolhe) हे दाम्पत्य भुषवणार आहे. मेलबर्न येथे पार पाडत असलेल्या मराठी त्रैवार्षिक संमेलनासाठी कोल्हे दाम्पत्याला निमंत्रण मिळाले हे गौरवास्पद (Honor of the Kolhe couple ) समजले जात आहे.